नागपूर सुधार प्रन्यासमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार(Corruption) झाला आहे.यात मोजक्याच लोकांना पैसे देऊन आरएल देण्यात आलं असा आरोप बंटी शेळके यांनी केला आहे. एनआयटीचे चेअरमन यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

जोरदार घोषणाबाजी करत एनआयटी भ्रष्ट्राचार(Corruption) होत आहे, काही बिल्डर्सला पैसे देऊन मान्यता दिली जात असल्याचा आरोप बंटी शेळकेंनी केला आहे. नागपूर सुधार प्रन्यासमध्ये सामान्य माणसाला लुटलं जात आहे.
हे सामान्य माणसासाठी काम करत नाही असं देखील बंटी शेळके यांनी सांगितलं आहे. हजारो लाखो लाभधारकांनी लूट या NIT ने केली असल्याचा धक्कादायक आरोप देखील शेळके यांनी केला आहे.
हेही वाचा :
प्रेमाचा खोटा दिखावा कधीच करत नाही ‘या’ जन्मतारखेचे लोक!
मंदिरात गेल्याने सारा अली खान ट्रोल! श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पण…
‘1 एप्रिलपासून…’ मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी मोठा निर्णय