सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट पोहा कटलेट

सकाळच्या (breakfast)नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नेहमी नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा, पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही स्वादिष्ट पोहा कटलेट बनवू शकता. कटलेट हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. शिवाय तुम्ही बनवलेले पोह्यांचे कटलेट कुटुंबातील सगळेच आवडीने खातील.

सकाळच्या वेळी पोटभर (breakfast)नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण काही लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी किंवा इतर काही कारणांमुळे सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. मात्र असे केल्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया पोह्यांचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
पोहे
बटाटा
कांदा
हिरवी मिरची
मीठ
उकडवून घेतलेले मटार
कोथिंबीर
कॉर्न फ्लॉवर
जिरा पावडर
चाट मसाला
लाल तिखट
कोथिंबीर

कृती:
पोहा कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, पोहे स्वच्छ साफ करून 3 वेळा पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर काहीवेळ पोहे पाण्यात भिजत ठेवा.
मोठ्या बाऊलमध्ये उकडवून घेतलेला बटाटा मॅश करून त्यात उकडलेले हिरवे वाटणे टाकून मॅश करून घ्या.
नंतर त्यात भिजवलेले पोहे घालून बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, जिरं पावडर, चाट मसाला टाकून मिक्स करा.
नंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, कॉर्न फ्लॉवर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
तयार केलेली मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट बनवून तव्यात दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घ्या.
तयार आहे सोप्या पद्धतीमधे बनवलेले पोह्यांचे कटलेट.

हेही वाचा :

आझाद’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च; अमन आणि राशाची दमदार केमिस्ट्री, एकदा जरूर पाहा! VIDEO

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांकडून दबाव वाढला

‘या’ राशींचे भाग्य बदलणार? वाईट काळ संपून नशीब उजळणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..