पक्षाला सोडून जाणारे कंस आणि रावणाचे वंशज…”; खासदार संजय राऊतांची गंभीर टीका

राज्यामध्ये विधानसभा(Assembly) निवडणूकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सोडून महायुतीसोबत वेगळी चूल मांडली आहे. यामुळे राष्ट्रवादीमध्ये देखील दोन गट असून विधानसभा निवडणूकीमध्ये शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे.

यामध्ये हिवाळी अधिवेशनावेळी सभागृहाच्या आवारामध्ये (Assembly)अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना ऑफर दिल्याची चर्चा होती. यामुळे विरोधकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.

सुनील तटकरे यांनी खासदारांना ‘बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला’ असा सल्ला दिला होता, असे बोलले जात आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी जोरदार टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.

यावर आता खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, “संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे, तेवढीच ही भाषा क्रूर आणि निर्घृण आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पुढे खासदार राऊत म्हणाले की, “संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे, तेवढीच ही भाषा क्रूर आणि निर्घृण आहे. ज्या पितृतुल्य नेत्याने तुम्हाला या स्तरावर नेलं, पण तुम्ही बाप-लेकीला सोडा, ही भाषा वापरण्यापर्यंत, या स्तरापर्यंत येता हे गंभीर आहे. केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी तुम्ही ही पातळी गाठता, ते क्रूर आहे,” अशा शब्दांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

पुढे संजय राऊत यांनी अमित शाह यांनी केंद्रामध्ये मंत्रिपद देण्यासाठी प्रफुल पटेल यांना टार्गेट दिले असल्याची गंभीर टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “अमित शहांना खुश करण्यासाठी मोगॅम्बोला खुश करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत , ज्या कठीण परिस्थितीत शरद पवार यांनी कष्ट करून 8 खासदार निवडून आणले , त्यातले काही लोक जर सोडून जात असतील तर ते रावणाचे वंशज आहेत, अशा शब्दांत राऊतांनी हल्ला चढवला. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल, कोणी पक्षातून फुटत असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्घृण-अमानुष असतील,” अशा कडक शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “सुनील तटकरे यांनी फोन नाही केले. ते संसदेमध्ये भेटले. यावेळी त्यांनी खासदारांना सांगितलं की, बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा. आणि या आमच्याकडे. एकीकडे आमचं दैवत आहे म्हणायचं. पक्ष आणि निशाणी घेतली हे ठीक आहे.

आता खासदार पण पळवा. आणि वर एकत्र येतात म्हणून बोंबाबोंब करत आहे. बापाला आणि पोरीला सोडा असं सांगतात. यावरुन संस्कार आणि काय तुमची संस्कृती हे दिसून येत, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. तसेच ऑफर देण्याऱ्यांवर अजित पवार गटाच्या नेत्यांवर रोष व्यक्त केला आहे.”

हेही वाचा :

फणा काढत मुंगुसासमोर डिंग्या मारत होता नाग, तितक्यात बदलला खेळ; जीवघेण्या लढतीचा Video Viral

3 राशींचं नशीब; चांदीच चांदी, पदोपदी होणार धनलाभ

19 वर्षांनंतर मकर संक्रांतीला घडणार अद्भुत योगायोग, या राशीच्या लोकांना होणार मोठा फायदा