पीरियड्समुळे अभिनेत्रीची परिस्थिती वाईट, सेटवर पोहोचायला झाला उशीर; मग दिग्दर्शकानं जे केलं…

अभिनेत्री (actress)नित्या मेनन साऊथ इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नित्याने तिच्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री नित्या मेनन नेहमी तिच्या रोखठोख भूमिकेमुळे चर्चेत असते.

ती नेहमी संवेदनशील मुद्द्यांना खूप चांगल्या पद्धतीने हाताळत त्याबाबत आपलं मत मांडते. आता पुन्हा एकदा(actress) अभिनेत्री नित्या मेनन हिने मीडिया समोर इंडस्ट्रीबद्दल काही गौप्यस्फोट केले आहेत. तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे की, फिल्म इंडस्ट्री अनेक वेळा असंवेदनशील असते. यावेळी तिने सांगितलं की, पीरियड क्रॅम्प्समुळे सेटवर उशिरा पोहोचल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया काय होती.

अभिनेत्री नित्या मेनन हिने इंडस्ट्रीत काम करताना येणाऱ्या मानसिकतेबद्दल सांगितलं की, इथे कलाकारांनी त्यांच्या आरोग्याची पर्वा न करता कामगिरी करणे अपेक्षित असते. याबाबतीत थोडी क्रूरता असते. तुम्ही कितीही आजारी असलात किंवा अडचणीत असलात तरी, तुम्ही येऊन तुमचं काम करावं, अशी अपेक्षा असते. आपल्याला त्याची सवय झाली आहे, असंही तिने सांगितलं

अभिनेत्री नित्या मेनन सध्या तिच्या ‘कधलिक्का नेरमिल्लई’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त आहे. नित्या मेनन 19 वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये आहे. या काळात तिने दिग्गज सेलिब्रिटी आणि दिग्दर्शकांसोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच, माध्यमांशी बोलताना त्यांनी फिल्म इंडस्ट्रीबद्दलच्या काही गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत.

यावेळी नित्याने 2020 च्या थ्रिलर ‘सायको’ चित्रपटाच्या शूटींग दरम्यानचा एक एक किस्सा शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मायस्किन यांच्यासोबत काम करताना एक वेगळा अनुभव आल्याचं तिने सांगितलं. शूटिंगच्या पहिल्या दिवशी नित्याला मासिक पाळी आली आणि तिला भयंकर वेदना होत होत्या.

वेदना असह्य झाल्याने तिला काम करणं शक्य नव्हतं, त्यावेळी नित्याने याबद्दल दिग्दर्शक मायस्किन यांच्याशी बोलण्याचं धाडस केलं. यावेळी त्यांनी तिला समजून घेतलं. दिग्दर्शकाची अशी पाहून अभिनेत्री नित्यालाही आश्चर्य वाटले, कारण इंडस्ट्रीमध्ये याबाबतीत इतकी संवेदनशील प्रत्येक जण दाखवत नाही.

नित्या पुढे म्हणाली की, त्यांनी मला रजा घेऊन आराम करण्यास सांगितलं. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा मी एका पुरुष दिग्दर्शकाला पीरियड्सबद्दल सांगितलं होतं. त्यांनी मला विचारलं की, पहिला दिवस आहे का? त्यावेळी मला कळलं की, ते मला समजून घेत आहेत आणि त्यांना माझी काळजी आहे.

त्यांनी मला आराम करायला सांगितलं आणि तब्येत ठिक वाटल्यावर सेटवर यायला सांगितलं. दिग्दर्शक मायस्किन यांनी यावेळी नित्याला सांगितलं होतं की, त्यांनाही आई, पत्नी आणि मुली आहे. दिग्दर्शकाची ही प्रतिक्रिया पाहून फार आनंद झाल्याचंही तिने सांगितलं.

हेही वाचा :

चार्जिंगदरम्यान मोबाईलचा स्फोट! दुकानदाराच्या चेहऱ्यावर आदळले ज्वलंत तुकडे; थरारक Video Viral

तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण; आरोपींना अटक, कारण समोर आल्याने सर्वांच्याच उडाल्या भुवया

संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, ते डिप्रेशनमध्ये: भाजप नेत्याचा जोरदार हल्लाबोल