पोस्टातील या योजनेत पैसे गुंतवा अन् निश्चिंत राहा, तुमचे पैसे नक्की दुप्पट होणार

जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीसंदर्भात कोणतीही जोखीम घ्यायची नसेल तर किसान विकास पत्राचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. किसान विकास पत्रात तुम्हाला (Invest)गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल.

या योजनेत (Invest)गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होण्याची गॅरंटी सरकारकडून घेतली जाते. जर तुम्ही किसान विकास पत्रात 10 लाखांची गुंतवणूक केल्यास कालावधी पूर्ण झाल्यानंतर 20 लाख रुपये मिळू शकतात.

किसान विकास पत्र योजनेत एखाद्या गुंतवणूकदारानं 115 महिने म्हणजेच 9 वर्ष 7 महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट होते. या योजनेवर 7.5 टक्क्यांच्या हिशोबानं व्याज मिळतं.व्याजाची मोजणी वार्षिक आधारावर केली जाते. या योजनेत कोणताही व्यक्ती 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करु शकतो. तर, कमाल गुंतवणुकीची काही मर्यादा नाही. या योजनेत खाती उघड्याची देखील संख्या मर्यादित नाही.

किसान विकास पत्राची सुरुवात 1988 मध्ये झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीला पोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. आता या योजनेत सर्वजण गुंतवणूक करु शकतात. आता या योजनेत 18 वर्ष पूर्ण झालेला कोणताही व्यक्ती वैयक्तिक किंवा संयुक्त खात्याद्वारे गुंतवणूक करु शकतो. याशिवाय 10 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मुलांच्या नावावर देखील किसान विकास पत्र उघडता येतं.

किसान विकास पत्राचं खातं उघडताना आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट साइज फोटो, किसान विकास पत्र अर्ज आणि इतर कागदपत्रांची गरज असते. अनिवासी भारतीय या योजनेसाठी अपात्र आहेत.

किसान विकास पत्रात खातं उघडल्यानंतर अडीच वर्षानंतर मुदतीपूर्वी खातं बंद करुन रक्कम काढता येऊ शकते. याशिवाय काही अपवादा‍त्मक स्थिती रक्कम जमा देखील करता येते. किसान विकास पत्र खातेदार किंवा संयुक्त खातेदारापैकी एकाचा मृत्यू झाल्यास मुदतीपूर्वी खातं बंद करता येऊ शकतं.

भारतीय पोस्टाच्या वेबसाईटच्या पोर्टला भेट द्या किंवा तुमच्या इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगीन करा. तिथं किसान विकास पत्र आणि किसान विकास पत्र फॉर्म अ डाऊनलोड करा.

त्यानंतर त्या अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, गुंतवणुकीची रक्कम, पेमेंट मोड आणि प्रमाणपत्राचा प्रकार निवडा. याशिवाय नॉमिनेशन फर्म भरुन बँक किंवा पोस्ट ऑफिसकडे केवायसीसह द्यावी. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर रक्कम जमा करा. त्यानंतर किसान विकास पत्र मिळेल.

हेही वाचा :

“प्रसिद्ध अभिनेत्याचा फॅन मोमेंट: ‘भेटल्यावर KISS आणि गालाचा चावा!’ फॅनची हटके इच्छा

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: कोणत्या संघांनी जाहीर केले खेळाडूंचे संघ, भारताच्या टीमवर सगळ्यांच्या नजरा

धनंजय देशमुखांचा आत्मदहनाचा इशारा; राज्य सरकार काय निर्णय घेणार?