Flipkart आणि Amazon ची सेल सुरु, स्मार्टफोनपासून होम अप्लायंसेसपर्यंत सर्व वस्तूंवर आकर्षक डिस्काऊंट!

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि (Amazon)ॲमेझॉनचा प्रजासत्ताक दिनाचा सेल आज 13 जानेवारीपासून सुरु झाला आहे. 13 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून फ्लिपकार्ट प्लस आणि ॲमेझॉन प्राइम सदस्यांसाठी सेल लाईव्ह झाला आहे.

तर नॉन-प्राइम आणि प्लस (Amazon)ग्राहकांसाठी आज 13 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होत आहे. या दोन्ही सेलमध्ये तुम्हाला जबरदस्त डिस्काऊंट आणि आकर्षक ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

सेलदरम्यान दोन्ही कंपन्या ॲपलसह मोठ्या ब्रँडवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ज्यामुळे ग्राहक कमी किंमतीत खरेदी करू शकतील. सेलदरम्यान स्मार्टफोनपासून होम अप्लायंसेसपर्यंत ते स्किन केअर उत्पादनांपासून कपड्यांपर्यंत सर्वच वस्तूंवर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे प्रत्येकासाठीच ही खरेदीची एक चांगली संधी आहे.

सेलमध्ये ग्राहकांना नवीनतम लाँच करण्यात आलेल्या OnePlus 13, OnePlus 13R स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय iPhone 15, Galaxy M35, Galaxy S23, Honor 200 आणि Realme Narzo N61 सारखे फोन देखील कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. त्याचप्रमाणे, स्कीन केअर इत्यादी प्रोडक्ट्सवर 70-80 टक्क्यांपर्यंत सूट देखील उपलब्ध आहे.

फ्लिपकार्ट ॲपलच्या फ्लॅगशिप सीरीजवर भरघोस डिस्काऊंट ऑफर करत आहे. या सेलमध्ये ग्राहक केवळ 63,999 रुपयांमध्ये iPhone 16 खरेदी करू शकतील. त्याची लाँचिंग किंमत 79,900 रुपये होती. मात्र सेलमध्ये हा फोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

त्याचप्रमाणे iPhone 16 Plus हा 73,999 रुपयांना उपलब्ध आहे. प्रो मॉडेल्सबद्दल बोलायचे झाल्यास, सेलमध्ये iPhone 16 Pro 1,02,900 रुपयांना आणि iPhone 16 Pro Max हा 1,27,900 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय गुगल पिक्सेल, मोटोरोला आणि सॅमसंगचे फ्लॅगशिप स्मार्टफोनही डिस्काऊंटसह खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्टप्रमाणेच ॲमेझॉनही ग्राहकांना मोठ्या बचतीची संधी देत ​​आहे. ॲमेझॉन सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर आणि होम अप्लायन्सेसवर 65 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट उपलब्ध आहे. या सेलमध्ये इअरफोन आणि माइक सारख्या ॲक्सेसरीजची किंमत फक्त 199 रुपयांपासून सुरू होते. ॲमेझॉन सेलवर टीव्हीची किंमत 6,000 रुपयांपेक्षा कमी आहे. त्याचप्रमाणे, वॉशिंग मशीन आणि वॉटर प्युरिफायरची किंमत देखील 7,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

KODAK TVs आगामी फ्लिपकार्ट सेल आणि ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये मोठ्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. जर तुम्हाला ब्रँडेड स्मार्ट टीव्ही स्वस्तात विकत घ्यायचा असेल तर ही डील तुमच्यासाठी बेस्ट आहे. Kodak TV फक्त 5,999 रुपयांना सेलमध्ये खरेदी करता येईल. हे टीव्ही DTS TRUSURROUND साउंडला सपोर्ट करतात. हे QLED 4K डिस्प्लेने सुसज्ज आहेत.

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या विक्रीमध्ये उपलब्ध असलेल्या विशेष बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फ्लिपकार्टवर HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर ग्राहकांना 10 टक्के झटपट सूट मिळेल. ॲमेझॉन सेलमध्ये, ग्राहकाने SBI क्रेडिट कार्डद्वारे टीव्ही खरेदी केल्यास 10 टक्के सूट मिळू शकते.

हेही वाचा :

उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल: ‘पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवणे गुन्हा’

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यातले वाद मिटणार? चर्चेत बच्चू कडूंचं ‘ते’ विधान

मरने से पहले, तमन्ना थी जी भर के जीने की, लेकिन..