अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ओळख झाली अन्…

‘फ्री फायर’ स्वरुपाच्या ऑनलाईन गेममधून ओळख झाल्यानंतर राजनगरी अहेरीत लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. एका अल्पवयीन (girl)मुलीवर 22 वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केला. यासंदर्भात अहेरी पोलिस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद सौद राजू शमसुद्दीन अन्सारी (वय 22, रा. मालेगाव जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथील 14 वर्षीय (girl)पीडितेचे फ्री फायर या ऑनलाईन गेममध्ये आरोपीसोबत ओळख झाली.

यातून दोघांमध्ये संवाद वाढला व त्याचे रुपांतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात झाले. यातून आरोपी मोहम्मद अन्सारी हा मालेगाववरून थेट अहेरीत पोहोचला. शनिवार (दि.11) ते रविवार (दि.12) दरम्यान आरोपीने पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. यासंदर्भात अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मैत्री करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी मोहम्मद अन्सारी यास अटक केल्यानंतर त्यास अहेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशातील इटावा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे 12 जानेवारी रोजी एका अभियंताचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. तपासानंतर असे आढळून आले की ही हत्या दुसऱ्या कोणी नाही तर पत्नीने तिच्या प्रेयसीच्या संगनमताने केली आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून, त्याच्या प्रेयसीच्या शोध घेत आहे. असा आरोप आहे की मृत व्यक्ती त्याच्या पत्नीसमोर त्याच्या प्रेयसीशी शारीरिक संबंध ठेवायचा.

विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून एका उच्चशिक्षित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करुन महिलेची ३८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध अत्याचार तसेच फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ३७ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा :

सोन्याच्या खाणीतील दुर्दैवी घटना: उपासमारीने 100 कामगारांचा अंत, हृदयद्रावक दृश्ये Video Viral

तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत!

सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय का?; रोहित पवारांचा संतप्त सवाल, म्हणाले, अजितदादांनी…