डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पश्‍चिम महाराष्ट्र संघटकपदी विनायक कलढोणे यांची निवड

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र(Journalists) संघटनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र संघटकपदी माय महाराष्ट्र न्युज चॅनेलचे विनायक कलढोणे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर संघटनेचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विनायक कलढोणे हे मागील सहा वर्षापासून इचलकरंजीत माय महाराष्ट्र न्युज चॅनेलच्या माध्यमातून डिजिटल मिडीयात काम करत आहेत. डिजिटल मिडीया संपादक पत्रकार(Journalists) संघटनेचे इचलकरंजी शहराध्यक्ष म्हणून ते चार वर्षापासून काम करत होते.

शहर आणि परिसरात त्यांनी संघटनेची चांगल्या पध्दतीने बांधणी केली. त्याचबरोबर गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात डिजिटल मीडिया संघटनेच्या दुसर्‍या राज्य अधिवेशनात विनायक कलढोणे व त्यांच्या टीमने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणष पार पाडली. या कार्याची दखल घेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत विनायक कलढोणे यांची संघटनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र संघटकपदी निवड केली आहे.

हेही वाचा :

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

इचलकरंजी : शेतजमीन मोजणीसाठी हायटेक यंत्रांचा वापर; अचूक मोजणीसाठी नवा उपक्रम”

केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार?