थंडीच्या दिवसांमध्ये आहारात पौष्टिक आणि पचनास हलक्या (breakfast)पदार्थांचे सेवन करावे. या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे आहारात नाचणीचे सेवन करावे. नाचणी खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

नाचणीमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात नाचणीचे सेवन करावे. नाचणीपासून भाकरी, स्मूदी इत्यादी पदार्थ बनवले जातात. अनेकदा सकाळच्या (breakfast)नाश्त्यासाठी काय बनवावं? हे सुचत नाही.
अशावेळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी नाचणीचे पौष्टिक सूप बनवू शकता. नाचणीचे सूप कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया नाचणीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
नाचणीचे पीठ
मीठ
तूप
फरसबी
वाटाणे
गाजर
काळी मिरी पावडर
कृती:
नाचणीचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात वटाणे, फरसबी, गाजर आणि पनीर इत्यादी तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या टाकून व्यवस्थित परतून घ्या.
त्यानंतर भाज्या वाफेवर शिजल्यानंतर चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून मिक्स करून घ्या.
दुसरीकडे टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर भाज्यांमध्ये गरम पाणी टाकून उकळी येण्यासाठी ठेवा.

पाण्याला उकळी आल्यानंतर वाटीमध्ये नाचणीचे पीठ घेऊन त्याची पातळ पेस्ट तयार करा.
तयार केलेली पेस्ट सूपमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करा. सूपला ५ मिनिटं उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पौष्टिक नाचणीचे सूप.
हेही वाचा :
या प्रकारची रत्न परिधान केल्यास करिअरला मिळेल चालना, संकटावर कराल मात
शुभ योग; 3 राशींचं नशीब पालटणार, घडणार अचंबित घटना
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर उमेदवारीबाबत मी इच्छुक नाही’; पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका स्पष्ट