सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई, चार जणांना ताब्यात घेतलं

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर(entertainment news) मुंबईतील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सध्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सैफची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आता कसून तपास केला जातोय.

या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. सैफ अली खानच्या(entertainment news) घरातील चार कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी या चार जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांचे फोन देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.

सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात मध्यरात्री चाकू हल्ला झाला. सैफसह त्याच्या कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत होते. सैफवर हल्ला झाल्यानंतर जेव्हा घरातील इतर सदस्य जागे झाले, तेव्हा चोर पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. सैफवर चोराने चाकूने हल्ला केला. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा झाल्या आहेत.त्यापैकी दोन जखमा खोलवर झाल्या आहेत. तर, एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे.

या घटनेनंतर सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून या सर्व प्रकारामुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागलं आहे.

पोलिसांनी सैफच्या घरी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सैफच्या आसपासच्या परिसरात दोन ते तीन सीसीटीव्ही आहे. गेटवरही सीसीटीव्ही आहेत. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे चोराचा माग घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा :

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर उमेदवारीबाबत मी इच्छुक नाही’; पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका स्पष्ट

थंडीत निरोगी राहण्यासाठी बनवा नाचणी सूप, सोपी रेसिपी जाणून घ्या

पीएम किसानच्या 19व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी: 2000 रुपये कधी येणार?