मुंबईच्या खेळाडूने ड्रेसिंग रूममधील गोष्टी लीक केल्याचे गौतम गंभीरचे आरोप!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर(Team India) भारतीय संघाला 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाने जवळजवळ 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावली.

टीम इंडियाच्या(Team India) ड्रेसिंग रूममध्ये फूट पडल्याच्या बातम्या समोर आल्या. खरं तर, अलीकडेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले होते की, जर खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील चर्चा त्यांच्यापुरती मर्यादित राहिली तर ते संघाच्या वातावरणासाठी चांगले होईल. तसेच, भारतात परतल्यानंतर भारतीय मुख्य प्रशिक्षकांनी या सर्व गोष्टींबाबत बीसीसीआयसोबत आढावा बैठक घेतली.

त्याचवेळी, भारतीय संघाचा युवा फलंदाज सर्फराज खानवर एक मोठा आरोप करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी युवा खेळाडू सर्फराज खानवर ड्रेसिंग रूममधील संभाषणे लीक केल्याचा आरोप केला आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत निषेधांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या वृत्तांमध्ये असे म्हटले आहे की, सर्फराज खान ड्रेसिंग रूममधील गोष्टी बाहेरील माध्यमांसोबत शेअर करत होता.

मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना कडक शब्दांत फटकारले होते. यावेळी, गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये चांगला समाचार घेतला होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, भारतीय संघातील एक खेळाडू जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्याच्या बाजूने नव्हता.
कारण त्याला कर्णधार व्हायचे होते. पण, या खेळाडूचे नाव उघड करण्यात आले नाही. आतापर्यंत गौतम गंभीरने त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सादर केलेला नाही.

सर्फराज खानने गेल्या वर्षीच टीम इंडियासाठी पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करून तो चर्चेत राहिला. पण जेव्हा तो 13 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्यावर वय चोरण्याचा आरोप झाला. 2011 मध्ये, एका शाळेने सर्फराजवर त्याचे वय चुकीचे दाखवल्याचा आणि तो त्याच्यापेक्षा खूप मोठा असल्याचे सांगण्याचा आरोप केला.

यानंतर त्याच्या हाडांचीही तपासणी करण्यात आली. यानंतर, हाडांच्या वयाच्या मूल्यांकनात, त्याचे वय 15 वर्षे असल्याचे आढळून आल. पण, नंतर केलेल्या प्रगत तपासात असे सिद्ध झाले की सर्फराज प्रत्यक्षात 13 वर्षांचा होता. पण या घटनेनंतर सर्फराज खानचा आत्मविश्वास कमी झाला. या धक्क्यामुळे त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि मानसशास्त्रज्ञाची मदतही घेतली. यानंतर तो पुन्हा मैदानात परतला.

हेही वाचा :

घरमालकाने भाडेकरू महिलेवर 8 वर्ष अत्याचार करत व्हायरल करण्याची दिली धमकी

शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर; एकमेकांकडे बघणंही टाळलं

सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई, चार जणांना ताब्यात घेतलं