अमेरिकेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. भारतानंतर आता अमेरिकेने देखील टिकटॉकवर बंदी घातली आहे. टिकटॉक बॅन होताच आता लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने एक नवीन ॲप लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन ॲप इंस्टाग्राम युजर्ससाठी(users) मोठं वरदान ठरणार आहे. कारण हे नवीन ॲप व्हिडीओ एडिटींगसंबंधित असणार आहे. Edits या नावाने हे नवीन ॲप लाँच करण्यात येणार आहे.

इंस्टाग्रामने एका नवीन व्हिडिओ एडिटिंग ॲपची घोषणा केली आहे. इंस्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी या नवीन ॲपचे अनावरण केले आहे. मात्र सध्या हे व्हिडिओ एडिटिंग ॲप युजर्ससाठी(users) लाँच करण्यात आलेलं नाही. सध्या या नवीन ॲपची रिलीज टाईमलाइन उघड करण्यात आलेली नाही. पण या नवीन ॲपमध्ये कोणते फीचर्स दिले जाऊ शकतात, याबद्दल काही लिक्स समोर आले आहेत. यानुसार अंदाज लावला जाऊ शकतो की हे नवीन ॲप युजर्ससाठी प्रचंड फायद्याचं ठरणार आहे.
इंस्टाग्राम हे ॲप अशा लोकांसाठी लाँच करणार आहे ज्यांना फोनवर व्हिडिओ बनवायला आवडते. यात अशी अनेक व्हिडिओ एडिटिंग टूल्स उपलब्ध असतील, ज्यामुळे यूजर्सचा अनुभव मजेदार होईल. युजर्स हे व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करू शकतील ज्यामुळे त्यांचे फॉलोवर्स वाढवण्यासाठी मदत होऊ शकते.

Mosseri च्या मते, Edits ॲप हे फक्त व्हिडिओ एडिटिंग ॲप नाही. व्हिडिओ तयार करणे आणि शेअर करणे सोपे आणि सीमलेस बनवण्यासाठी हे नवीन ॲप डिझाईन करण्यात आलं आहे. ॲपमध्ये एक डेडीकेटेड इंस्पिरेशन टॅब, आइडियाज सुरू करण्यासाठी जागा आणि सर्व एडिटिंग टूल समाविष्ट आहेत. हे ॲप हाई-क्वालिटी कॅमेरा देखील देते, जो मोसेरीने स्वतः त्याचा घोषणा व्हिडिओ चित्रित करण्यासाठी वापरला होता.

एडीटींग ॲपची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ड्राफ्ट्स शेअर करून मित्र आणि सहकारी क्रिएटर्ससोबत कोलेब्रेशन करू शकता. iOS ॲप स्टोअर सूचीनुसार, एडिट इन फीचर्ससह व्हिडिओ तयार करण्याची प्रक्रिया सुलभ करते.
-वॉटरमार्कशिवाय व्हिडिओ एक्सपोर्ट करा आणि ते कोणत्याही प्लॅटफॉर्मवर शेअर करा.
-सहज प्रवेशासाठी सर्व एक्सेस आणि व्हिडिओ एकाच ठिकाणी स्टोर केले जाऊ शकतात.
-10 मिनिटांपर्यंत हाई-क्वालिटी क्लिप कॅप्चर करा आणि त्वरित एडिट सुरू करू शकता.
-तुम्ही Instagram वर 1080p रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ शेअर करण्यास सक्षम असाल.
-फ्रेम बाय फ्रेम अचूक व्हिडिओ एडिटिंग.
-रिझोल्यूशन, फ्रेम रेट आणि डायनॅमिक रेंजसाठी हाय क्वालिटी कंट्रोल कॅमेरा .
परफॉर्मंस देखील ट्रॅक करता येणार
हे ॲप केवळ एडिटिंगपुरते मर्यादित नाही, तर ते क्रिएटर्सना नोटिफिकेशन कंट्रोल ठेवण्यास मदत करते. लाइव्ह इनसाइट्स डॅशबोर्ड व्हिडिओ परफॉर्मंस ट्रॅक करण्याची परवानगी देते. ज्यामध्ये स्किप रेट आणि फॉलोअर vs नॉन-फॉलोअर इंटरॅक्शन आणि डिटेल दर्शवले जातात.
तुम्ही iOS ॲप स्टोअरवरून एडिट ॲपची प्री-ऑर्डर करू शकता. हे लवकरच अँड्रॉईडवर देखील येणार आहे. त्यामुळे आता सर्व इंस्टाग्राम युजर्स(users) या नवीन ॲपची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. हे नवीन ॲप युजर्ससाठी फायदेशीर ठरणार यामध्ये काही शंकाच नाही.
हेही वाचा :
राज्याला “पालक” मिळाले मात्र काही मंत्री नाराज…!
आता ‘या’ नेतेमंडळींमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बळ वाढणार; पक्षाला मिळाली नवसंजीवनी
पती-पत्नी और वो…आता काय फुल ऑन राडा! पत्नीने पतीला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले Video Viral