महायुतीत वादाची ठिणगी? ‘या’ मुद्यावरून एकनाथ शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात(political issue) अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतर पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सोडवताना महायुतीच्या घटकपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली.

आता नियुक्तीनंतर पुन्हा त्यात भरच पडली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या(political issue) ज्येष्ठांना डावलल्याने नाराजीचा सूर आहे. सबंध राज्यभरातील शिंदेंचे शिवसैनिक भाजपवर उघड नाराजी व्यक्त करत असून, याबाबत स्पष्टता असावी अशी भूमिका व्यक्त करत आहेत. नागपुरातील शिवसैनिकही विदर्भात शिंदे गटाला आणखी संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांना डावलल्याने पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. विदर्भाचा विचार केल्यास रामटेकचे आमदार तसेच वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर विदर्भातीलच 7 जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व देण्यात न आल्याने किमान या जिल्ह्यात शिंदे गटातील ज्येष्ठांना संधी देता आली असती, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली.

विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावती, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व नाही. यातील गोंदिया, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्यांना संधी देण्यात आली. गोंदियात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, बुलढाण्यात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील तर, वाशिममध्ये हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद दिले.

भंडारा येथे भाजपचे नेते व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, चंद्रपूर येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, अमरावती येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली गेली.

शिंदे गटाचे पूर्व विदर्भ सहसंपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांनी पालकमंत्री नियुक्तीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील असल्याचे सांगत विदर्भातील सहा जिल्ह्यांपैकी दोन ठिकाणी ज्येष्ठांना संधी दिल्या जाऊ शकत होते, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादीचे विदर्भात संघटन नसतानाही त्यांना तीन ठिकाणी संधी मिळाली. शिंदे गटाला बुलढाणा, वाशिम या दोन जिल्ह्यांत संधी देता आली असती, अशी भूमिका व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा :

संपत्तीबाबत अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय!

Vodafone Idea चा नवीन 209 रुपयांच्या रिचार्ज आला बाजारात, रोज मिळेल 2 जीबी डेटा

एक्स गर्लफ्रेंडला दुसऱ्याची होताना पाहु शकला नाही; मंडपाबाहेरच तरूणाने…