कुंभमेळ्यामध्ये आग लागली नाही तर लावली…; ‘या’ खालिस्तानी संघटनेने घेतली जबाबदारी

प्रयागराज : उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळ्याचा मोठा उत्साह आहे. 144 वर्षांनंतर होणाऱ्या या महाकुंभमेळ्यासाठी नागा साधूंसह मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे. कोट्यवधी लोकांनी अमृतस्नान केले आहे. मात्र प्रयागराजमध्ये आगीची घटना देखील घडली आहे. रविवारी (दि.19) या आगीमध्ये मोठे नुकसान झाले. मात्र ही आग(Fire) लागली गेली नव्हती तर लावली गेली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खालिस्तानी संघटनेने याची जबाबदारी घेतली आहे.

रविवारी प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात सेक्टर 19-20 मध्ये आग(Fire) लागली होती. विवेकानंद सेवा समिती वाराणसीच्या टेंटमध्ये जेवण बनवताना ही आग लागली. आग कशी लागली, त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही आग वेगाने पसरली. त्यामुळे आसपासचे तंबू यामध्ये जळून खाक झाले. या टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे ब्लास्ट झाले. जवळपास 20 ते 25 तंबू या आगीत जळाले. ही आग गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे झाल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली होती. मात्र आता हा हल्ला खालिस्तानी संघटनेने घेतली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कुंभमेळ्यामध्ये लागलेली आगीच्या घटनेची खालिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ई-मेल पाठवला आहे, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे. ही सुरुवात आहे, असं म्हटलं आहे. यामुळे कुंभमेळ्यावर खालिस्तानी संस्थेच्या हल्ल्याचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

प्रयागराजमधील कुंभमेळ्यामधील सेक्टर 19-20 मध्ये आग लागली होती. जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल होत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. पोलीस आणि एनडीआरएफच्या टीम्सनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसपासचे हिस्से रिकामे केले.

शास्त्री पुल आणि रेल्वे पुल दरम्यान ही आग(fire) लागली होती. हा पूर्ण भाग महाकुंभ क्षेत्रामध्ये येतो. टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडर्सचे एकापाठोपाठ एक ब्लास्ट झाले, त्यामुळे आगीने विक्राळ रुप धारण केलं. सिलेंडर ब्लास्टमुळे आग वेगाने पसरली. आगीच्या या घटनेमुळे संपूर्ण क्षेत्रात एकच घबराट, गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील घटनास्थळी भेट देत महाकुंभमेळा परिसरात दाखल झाले. दरम्यान, परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्रीही त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. मेळा आणि पोलिस प्रशासनाव्यतिरिक्त, त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडूनही घटनेची माहिती गोळा केली. तसेच तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.

परिसरात आग आणि आपत्ती टाळण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दिले. जेणेकरून सुरक्षित महाकुंभात भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यावेळी डीआयजी वैभव कृष्णा, फेअर ऑफिसर विजय किरण, एसएसपी राजेश द्विवेदी, अग्निशमन उपसंचालक अमन शर्मा, ओएसडी आकांक्षा राणा आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

भीषण अपघात! भरधाव ट्रक दरीत कोसळला; 10 ठार, 15 जखमी

व्हीव्हीआयपींच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारचा नवा आदेश, खर्चावर बसणार आळा

मोफत, मोफत, मोफत…! भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज , IND vs ENG दुसऱ्या T20 साठी