‘जेलर’ फेम विनायकनचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल, बाल्कनीत येऊन गैरवर्तन

मल्याळम-तमिळ चित्रपट अभिनेता विनायकन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर(social media) व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याने जाहीर माफी देखील मागितली आहे. अभिनेते रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटात विनायकनं खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर विनायकनला देशभरात लोकप्रियता मिळाली आहे. मात्र, अभिनेता विनायकन अभिनयापेक्षा जास्त त्याच्या वादांमुळे चर्चेत आला आहेत.

सध्या सोशल मीडियावर(social media) विनायकनचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विनायकन बाल्कनीमध्ये उभा राहून आरडाओरड करताना दिसत आहे. त्यासोबतच तो शेजाऱ्यांशी वांद घालत असल्याचं दिसत आहे. यावेळी तो बोलत असताना असभ्य भाषा वापर असल्याचं दिसून येत आहे.

तर त्याने यावेळी शरीरावर गुंडाळलेला कपडा सतत हटवताना दिसत आहे. असे करताना तो एकदा खाली देखील पडला आहे. सध्या अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. त्यासोबत हा व्हिडीओ अश्लिल, असभ्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट करून समाजाची माफी मागितली आहे. त्याच्यामुळे आलेल्या ‘नकारात्मक उर्जे’बद्दल देखील त्याने खंत व्यक्त केली आहे. त्याला चुकीच्या वर्तनाची जाणीव झाल्यानंतर अभिनेत्याने पश्चात्ताप व्यक्त केला आहे. अभिनेत्याने या पोस्टमधून वैयक्तिक समस्यांशी झुंजत असल्याचे म्हटले आणि सार्वजनिकरित्या त्याचे वर्तन सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देखील दिले आहे.

अभिनेता विनायकन गेल्या वर्षी देखील वादामुळे चर्चेत आला होता. विनायकनने दारूच्या नशेत हैदराबाद विमानतळावर गोंधळ घातला होता, त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली होती. केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्याबद्दल विनायकन याने एकदा अपमानास्पद शब्द वापरले होते. MeToo मोहिमेदरम्यान कमेंट केल्यामुळेही तो वादात सापडला होता.

हेही वाचा :

किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार? अर्थसंकल्पातून शेती क्षेत्राला मिळणार का नवे वळण?

टीम इंडियाच्या जर्सीवर ‘पाकिस्तान’ चं नाव असणार की नाही? BCCI च्या सचिवांनी स्पष्ट केलं

24 जानेवारीपासून ‘या’ 4 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु, सर्व चिंता होतील दूर