बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांचे वडील(father) नौरंग यादव यांचे निधन झाले आहे. हे काही काळ आजारी होते. त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर अभिनेता राजपाल यादव गुरुवारी (२३ जानेवारी) थायलंडहून दिल्लीला पोहोचला.
अभिनेत्याला आशा होती की त्याचे वडील(father) बरे होतील आणि घरी परततील. परंतु त्यांच्या वडिलांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. या बातमीनंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. राजपाल यादव हा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरचा रहिवासी आहे. त्यांच्या वडिलांचे अंतिम संस्कार त्यांच्या मूळ जिल्ह्यातच केले जातील असा अंदाज वर्तवला जात आहे.
बुधवारी अभिनेत्यासह ४ स्टार्सना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. विनोदी कलाकार आणि अभिनेते राजपाल यादव आणि कपिल शर्मा यांना धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. हा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. या दोन स्टार्स व्यतिरिक्त सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांनाही धमक्या मिळाल्या आहेत. पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी शोध घेत आहेत.
या घटनेनंतर, राजपाल यादवचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो असे म्हणत असल्याचे ऐकू येते की मी अंबोली पोलिस स्टेशन आणि सायबर क्राईम दोघांनाही कळवले आहे. यानंतर मी याबद्दल कोणाशीही बोललो नाही. या घटनेबद्दल बोलणे माझे काम नाही.
जेव्हा मला काहीच माहित नसते तेव्हा मी काय बोलावे? तो पुढे म्हणाला की मी एक अभिनेता आहे आणि मी अभिनय करतो. मी माझ्या कामाद्वारे सर्व वयोगटातील आणि तरुणांचे मनोरंजन करतो. मला काहीही बोलायचे नाही. या प्रकरणात कोणतीही माहिती नाही. मला मिळालेली माहिती मी सांगितली आहे.
राजपाल यादवच्या अभिनयाबद्दल तुम्हा सर्वांना आधीच माहिती आहे. राजपाल यादव हा विनोदासाठी ओळखला जातो आणि त्याने त्यात प्रभुत्वही मिळवले आहे. हा अभिनेता अलीकडेच कार्तिक आर्यन आणि विद्या बालन यांच्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात दिसला होता. जरी तो या चित्रपटाच्या पहिल्या भागातही होता. तो कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही अनेक वेळा दिसला आहे. तसेच अभिनेता नुकताच वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ या चित्रपटामध्ये तिच्याससोबत काम करताना दिसला आहे.
हेही वाचा :
सामंजस्य कराराचे फलित, कोल्हापूर मात्र सदैव वंचित
मोठी बातमी! रामदेव बाबांच्या पतंजलीला FSSAI चा दणका
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! आजपासून लालपरीचा प्रवास महागला तर रिक्षा-टॅक्सी प्रवासही महागला