बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. केव्हा वैयक्तिक आयुष्यामुळे तर केव्हा फिल्मी करियरमुळे ती चर्चेत आली आहे. साराचा आज (२४ जानेवारी) ‘स्काय फोर्स’ नावाचा चित्रपट रिलीज झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ती कमालीची चर्चेत आहे. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड(Bollywood) इंडस्ट्रीत सारा एका राजकीय नेत्याच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. त्यावर आता सारा अली खानच्या रुमर्ड बॉयफ्रेंडने भाष्य केलं आहे.
सारा अली खानचं गेल्या काही दिवसांपासून पंजाबचे नेते फतेह जंग सिंह बाजवा यांचा मुलगा अर्जुन प्रताप बाजवासोबत नाव जोडलं जात आहे. ते सध्या भारतीय जनता पार्टीचे नेते असून त्यांच्याकडे पंजाबमधील पक्षाचे उपाध्यक्ष पद आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी साराचा आणि अर्जुनचा केदारनाथमधला एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. त्या व्हायरल फोटोमध्ये सारा आणि अर्जुन केदारनाथचे एकत्रित दर्शन घेताना दिसले. तेव्हापासून सारा अर्जुनला डेट करत असल्याची चर्चा होऊ लागली. दरम्यान, अर्जुन प्रताप बाजवाने एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये अभिनेत्याने अफवांचं खंडण केलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन आणि साराच्या नात्याच्या चर्चा सुरु आहेत. नात्याच्या अफवांचं खंडण करताना अर्जुन म्हणाला की, “चर्चा करणं हे लोकांचं काम आहे, ते त्यांचं काम करीत आहेत. मी माझ्या कामावर लक्ष देतो. बाकीच्यांकडे लक्ष देण्याऐवजी मी माझ्या करियरवर फोकस करत आहे.
या सगळ्या अफवा आहेत. मला यामुळे काहीच फरक पडत नाही.” अर्जुन हा एक प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल सुद्धा आहे. याशिवाय अर्जुनने आतापर्यंत अक्षय कुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’सह अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे. सारा अली खानचा ‘स्काय फोर्स’हा चित्रपट भारतासह जगभरात रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये सारासोबत वीर पहारिया, अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट आज अर्थात २४ जानेवारी २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे.
सारा शेवटची विजय वर्मासोबत ‘मर्डर मुबारक’ चित्रपटात दिसली होती. त्यांच्यासोबत चित्रपटात करिष्मा कपूरसह अनेक अनेक दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते. सारा सध्या वडील सैफ अली खान यांची काळजी घेताना दिसत आहे. अलीकडेच सैफवर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्याला डिस्चार्ज मिळाला आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! रामदेव बाबांच्या पतंजलीला FSSAI चा दणका
राजपाल यादव यांच्या वडिलांचे निधन, दिल्लीतील AIIMS मध्ये सुरु होते उपचार!
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! आजपासून लालपरीचा प्रवास महागला तर रिक्षा-टॅक्सी प्रवासही महागला