मार्केटींग करून नेता होता येत नाही अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(political issue) यांनी शरद पवार यांच्यावर केली. अमित शाह आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सहकार संमेलनामध्ये बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल, तसेच माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. या मंत्रालयामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(political issue) यांच्यावर टीका करत अमित शाह म्हणाले की, पवार साहेब तुम्ही 10 वर्ष या देशाचे कृषिमंत्री होते तेव्हा सहकार मंत्रालय तुमच्याकडे येत होता. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रच्या सहकार आंदोलनासाठी काय केलं? याचा हीशोब या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना द्या. तसेच तुम्ही साखर कारखान्यांसाठी काय केलं? याचा देखील उत्तर द्या आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही कृषिमंत्री असताना काय केलं? याचा हिशोब या राज्यातील शेतकऱ्यांना द्या असेही यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
तसेच फक्त मार्केटींग करून नेता होता येत नाही. यासाठी काम करण्याची गरज असते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना करत शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळून दिला असेही यावेळी अमित शाह म्हणाले.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, देशाचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय विज्ञान जोडलं. आपल्या देशात शेतीमध्ये नफा नाही असं सांगितलं जातं मात्र त्याला सहकारची जोड दिली तर आपल्या देशात एकही शेतकरी गरीब राहणार नाही असेही या संमेलनात बोलताना अमित शाह म्हणाले.
तर दुसरीकडे यापूर्वी देखील शिर्डी येथे भाजपच्या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार यांनी 1978 पासून दगाफटक्याचे राजकारण केले होते मात्र त्या राजकारणाला 20 फुट जमिनीत गाडण्याचे काम जनतेने केलं. अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर या अधिवेशातून केली होती.
हेही वाचा :
निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस आक्रमक; उद्या राज्यभर आंदोलन
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; 40 वर्षांपासून सोबत असलेल्या बड्या नेत्याने सोडली साथ
कलानगर महागणपती गणेशोत्सव मंडळाला कोल्हापूर पोलीस विभागाकडून उत्कृष्ट पुरस्काराने सन्मान