सोशल मीडियावर (social media)अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा अशा काही घटना दाखवल्या जातात ज्या पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतही असेच काहीसे दृश्य दिसून आले आहे.

यात एक महिला एक्वैरियममध्ये जलपरी बनून पोहताना दिसत आहे मात्र तितक्यात तिथे एक मासा येतो आणि महिलेच्या चेहरा आपल्या तोंडात टाकत तिला खाण्याचा प्रयत्न करतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या (social media)सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता तो वेगाने व्हायरल होत असतात.
वॉटर एक्वैरियममध्ये जलपरी पोशाख परिधान केलेल्या रशियन महिलेवर मोठ्या माशाने हल्ला केल्याची हृदयद्रावक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिलेवर अचानक एका मोठ्या माशाने हल्ला केल्याचे दिसून येत आहे. महिलेची कामगिरी पाहण्यासाठी आलेल्या लोकांनाही या हल्ल्याने धक्का बसला.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात महिला निळ्याशार पाण्याच्या आत जलपरीचा पोशाख घालून काही कर्तब करू पाहत असते मात्र तितक्यात तिच्या मागून एक मोठा मासा येतो आणि महिलेला काही समजेल त्याच्या आधीच तिच्यावर हल्ला करत तिचे डोके आपल्या तोंडात पकडतो.
असे घडताच पुढच्याच क्षणी महिला सतर्क होते आणि माशाच्या तोंडातून आपल्या डोके बाहेर काढत तिथून पळ काढते. या घटनेने मात्र आता सर्वचजण हादरले असून याचा व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
लॅडबिबल वेबसाइटनुसार, 22 वर्षीय रशियन जलपरी ॲनिमेटरचे चित्रीकरण चीनमधील जिशुआंगबन्ना येथील मत्स्यालयात करण्यात आले होते. जिथे त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकही उपस्थित होते. यादरम्यान परफॉर्मन्स देत असताना एक मोठा मासा महिलेवर हल्ला करतो.
त्यामुळे ती घाबरते, पण शौर्य दाखवत ती महिला लगेच माशाच्या तोंडातून तोंड काढते. सुमारे 6 सेकंदांची क्लिप यासह समाप्त होते. पण या व्हिडीओने इंस्टाग्राम यूजर्सना हैराण केले असून आता ते कमेंट करून या घटनेवर आपले मत देत आहेत.
या घटनेचा व्हिडिओ @meerkat.mediaa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांजी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आणि म्हणूनच आपण शार्कसह टँक्समध्ये जाऊ नये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा त्या माशाने तिला जवळजवळ मारले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.
हेही वाचा :
‘शिवाजी महाराज लाच देऊन सुटले…’; मराठी अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
परीक्षा केंद्रांबाबत मोठा निर्णय; शिक्षण मंडळाने उचललं मोठं पाऊल
लहानपणीचं प्रेम आठवलं, इन्स्टावर एक्स गर्लफ्रेंडला रिक्वेस्ट पाठवली; नव्या बॉयफ्रेंडचा पारा चढला, अन्…
मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात; रुग्णालयातील फोटो समोर