875 दिवसांनी सचिन तेंडुलकरचं क्रिकेटमध्ये पुनरागमन, भारताचं नेतृत्व करणार

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू(cricket) सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑक्टोबर 2022 नंतर मास्टर ब्लास्टर सचिन आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये भारताच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. 22 फेब्रुवारी 2025 पासून भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे.

ही स्पर्धा टी20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार असून यामध्ये भारतासह एकूण 6 संघ सहभागी होतील. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांचे संघ(cricket) भाग घेणार आहेत. या स्पर्धेत निवृत्त क्रिकेटपटू पुन्हा एकदा आपल्या खेळ कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाले आहेत.

भारताकडून सचिन तेंडुलकर, श्रीलंकेकडून कुमार संगकारा, वेस्ट इंडिजकडून ब्रायन लारा, ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉटसन, दक्षिण आफ्रिकेकडून जॅक्स कॅलिस आणि इंग्लंडकडून इयान मॉर्गन हे दिग्गज खेळाडू आपल्या संघाचे नेतृत्व करतील.

ही रोमांचक स्पर्धा नवी मुंबई, राजकोट आणि रायपूर येथे खेळवली जाणार असून क्रिकेटप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारत कसा खेळतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. क्रिकेट चाहत्यांसाठी ही स्पर्धा एक ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे, कारण यात अनेक महान खेळाडू पुन्हा एकदा त्यांच्या उत्कृष्ट शैलीत मैदानावर परतणार आहेत.

हेही वाचा :

आज ‘या’ 5 राशींवर प्रसन्न होणार देवी लक्ष्मी, हातात पैसा खेळणार

‘या’ वयात लग्न कराल तर वैवाहिक जीवनात व्हाल खुशाल, स्टडीत झाला खुलासा

काँग्रेससह ठाकरे गटाला पडणार खिंडार; अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात?