गेल्या काही वर्षांपासून जगभरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीतून जात असताना पाकीटमारी आणि फोन चोरण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले असले तरी आता दिवसाढवळ्या घरात घुसून चोरीचे(Theft) प्रकारही वाढू लागले आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर चोरीच्या(Theft) विविध घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच पंजाबमध्ये घडलेली एक घटना विशेष चर्चेत आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, तो पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रात्रीच्या वेळी एक तरुणी घराबाहेर असलेल्या वाहनावर निवांत बसलेली असून ती मोबाईलमध्ये व्यस्त आहे. परिसरात नागरिकांची फारशी वर्दळ नाही. इतक्यात, एका दुचाकीवरून दोन तरुण येतात आणि तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जातात. अचानक झालेल्या या घटनेने तरुणी घाबरते, तिच्या आवाजाने घरातील लहान मुले बाहेर येतात. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
She Took Two business days to React pic.twitter.com/VUDylSEMCO
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 30, 2025
ही घटना पंजाबमधील असल्याचे सांगितले जात आहे, मात्र याची खात्री होऊ शकलेली नाही. हा व्हिडिओ ‘Ghar Ke Kalesh’ या एक्स (माजी ट्विटर) अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. काहींनी “बिचारी खूप वाईट झालं” असे म्हटले आहे, तर काहींनी “बरं झालं जीवाला काही झालं नाही” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
टीप: हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याची पडताळणी झालेली नाही. ही माहिती केवळ वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देण्यात आली आहे. या घटनेचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले जात नाही.
हेही वाचा :
महा कुंभ, महा गर्दी, महा संकट “आपत्कालीन” चे अपयश
मंत्रालयाची सुरक्षा मंत्र्यांकडूनच धाब्यावर? नरहरी झिरवाळांची कार्यकर्त्यांसह घुसखोरी?
ट्रम्प यांची भारत आणि चीनला थेट धमकी; म्हणाले, ‘असं केलं तर मी 100% कर लावेन’