जिममध्ये(gym) ट्रेनरला पुढील वर्कआऊटबाबत विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसेच, या तरुणाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी पावणेदहाच्या सुमारास सुस रोड येथील स्टुडिओ व्हेलो सिटी जिममध्ये घडली.

राजन जंग सोनी (वय 33, रा. सुसगाव, मुळशी – Susgav, Mulshi) यांनी या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेश सुदाम साळेगावकर (वय 39) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनी हे जिममध्ये(gym) व्यायाम करत असताना पुढील वर्कआऊटबाबत ट्रेनरकडे विचारण्यासाठी गेले. त्यावेळी तिथे असलेल्या उमेश याने सोनी यांना विनाकारण मारहाण केली. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जातोय. पोलिसांनी आरोपी उमेश साळेगावकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
महा कुंभ, महा गर्दी, महा संकट “आपत्कालीन” चे अपयश
ट्रम्प यांची भारत आणि चीनला थेट धमकी; म्हणाले, ‘असं केलं तर मी 100% कर लावेन’
घराबाहेर बसायचं की नाही? गाडीवरुन आले अन् तरुणीच्या हातातून फोन हिसकावला Video