प्रेक्षक ‘स्क्विड गेम ३’ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेच्या तिसऱ्या सीझनची रिलीज(release) तारीख जहर झाली आहे. आता ही सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच चाहत्यांना पाहता येणार आहे. या मालिकेचा तिसरा भाग यावर्षी २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. या स्क्विड गेमच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाने खूपच धमाल केली आहे. आता या सिरीजचा तिसरा भाग काय धमाल करतो हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.

या मालिकेच्या तिसऱ्या सीझनच्या रिलीज(release) तारखेबाबत अधिकृत माहिती नेटफ्लिक्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देण्यात आली आहे. या शोचा तिसरा सीझन २७ जून २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी शोच्या तिसऱ्या भागाशी संबंधित काही छायाचित्रे देखील शेअर केली आहेत. जी पाहून चाहत्यांना अत्यंत आनंद झाला आहे.
‘स्क्विड गेम’च्या दुसऱ्या सीझनच्या सात भागांमध्ये अनेक चढ-उतार आणि ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. या सीझनबद्दल, दिग्दर्शक ह्वांगचा असा विश्वास होता की सीझन २ नंतर, ही कथा तिसऱ्या सीझनपर्यंत वाढवता येणार आहे. त्यांना वाटले की मालिकेच्या शेवटी एक वेगळा भाग असावा. अशा परिस्थितीत त्यांनी तिसरा सीझन करण्याचा निर्णय घेतला. आणि आता हा तिसरा सीझन पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
‘स्क्विड गेम’ ने जगभरात $900 दशलक्ष कमावले आहेत. पहिल्या २३ दिवसांत अंदाजे १३२ दशलक्ष लोकांनी हा शो किमान दोन मिनिटे पाहिला, ज्यामुळे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या हिट शो ‘ब्रिजर्टन’ने प्रस्थापित केलेला मागील विक्रम मोडला आहे. या शोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आणि सिरीजच्या प्रत्येक सीझनवर चाहत्यांनी प्रेम केले आहे.

या वेब सिरीजची कथा प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आहे की लोकांना कसे छळले जाते आणि गेम खेळण्यास भाग पाडले जाते. प्रेक्षकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की ही वेब सिरीज दक्षिण कोरियातील एका वास्तविक जीवनातील घटनेपासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. दक्षिण कोरियामध्ये, १९७० आणि १९८० च्या दशकात, लोकांना पकडून छळ छावण्यांमध्ये टाकण्यात आले आणि त्यांच्यावर विविध प्रकारचे छळ करण्यात आले.
ब्रदर्स होम्स नावाच्या अनाथाश्रमात खूप मोठ्या संख्येने लोकांना ठेवण्यात आले होते. काही अहवालांनुसार, जेव्हा ब्रदर्स होम्समधून लोकांना वाचवण्यात आले तेव्हा त्यापैकी बरेच जण आधीच मृतावस्थेत होते. सोशल मीडियावर असे म्हटले जात आहे की ‘स्क्विड गेम’ ही वेब सीरिज या घटनेपासून प्रेरित आहे.
हेही वाचा :
जिममध्ये ट्रेनरला वर्कआऊट विचारणं पडलं महागात; धक्कादायक प्रकार समोर
घराबाहेर बसायचं की नाही? गाडीवरुन आले अन् तरुणीच्या हातातून फोन हिसकावला Video
ट्रम्प यांची भारत आणि चीनला थेट धमकी; म्हणाले, ‘असं केलं तर मी 100% कर लावेन’