नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जनतेला संबोधित करताना अर्थसंकल्पाविषयी महत्त्वाचे संकेत दिले. त्यांनी देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. विशेषतः, त्यांच्या भाषणात लक्ष्मीदेवीचा उल्लेख करण्यात आल्याने, महाराष्ट्रात यशस्वी झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या(yojana) देशव्यापी अंमलबजावणीबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
अर्थसंकल्प आणि लक्ष्मीदेवीचा उल्लेख
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी सुख-समृद्धीची देवी श्रीलक्ष्मीला नमन करतो. आई लक्ष्मी आपल्याला यश, बुद्धी आणि समृद्धी देते. देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय समुदायावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहो, अशी मी प्रार्थना करतो.” या वक्तव्यानंतर लाडकी बहीण योजना(yojana) संपूर्ण देशभर लागू होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील यशस्वी प्रयोगाचा केंद्र सरकारला मोह?
महाराष्ट्रात महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील या योजनेचा विचार करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्र सरकारने यापूर्वी अनेक राज्यस्तरीय योजनांचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार केला आहे, त्यामुळे या योजनेलाही राष्ट्रीय स्वरूप मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प
पंतप्रधान मोदींनी यावेळी देशाच्या आर्थिक दिशेचा आढावा घेत, “हा अर्थसंकल्प आत्मविश्वास निर्माण करेल आणि देशाला विकसित भारताच्या दिशेने घेऊन जाईल,” असे सांगितले. त्यांनी 2047 मध्ये स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्धापनदिनी भारत एक विकसित राष्ट्र म्हणून ओळखला जाईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
सरकारचा पुढील अजेंडा काय?
पंतप्रधानांनी मिशन मोडमध्ये देशाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. नवोन्मेष, समावेशन आणि गुंतवणूक याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात केंद्र सरकार कोणत्या नव्या योजनांची घोषणा करते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा :
निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प
दिलासादायक ! महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात
पोटावर साचून राहिलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी मधात मिक्स करून खा ‘हा’ तिखट पदार्थ