अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना लाख मोलाचं गीफ्ट; या योजनेची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मोदी सरकारच्या तीसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प(budget) सादर करणार आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. महागाई कमी करण्यासाठी आणि टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जातील अशी शक्यता होती.

दरम्यान या अर्थसंकल्पात(budget) सात मोठ्या घोषणा होऊ शकतात अशी चिन्हं होती. करात सूट, मध्यमवर्ग, महिला आणि शेतक्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. दरम्यान सर्वात जास्त लक्ष होतं ते शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणांकडे. शेतकऱ्यांन विनाक्रडीट कर्ज देणाऱ्या किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

किसान क्रेडीट कार्डची मर्यादा पूर्वी ३ लाखांपर्यत होती. विनातारण शेतकऱ्यांना कर्ज मिळत दिलं जातं. त्यांची मर्यादा आता ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच शेतकऱ्यांनी खूश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. युरीया प्रकल्प आसाममध्ये उभारण्यात येणार आहे.

तसंच पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. यात फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्ष असणार आहे. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष देणार. उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. मखाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्रीनी सांगितले आहे. कापूस उत्पदनावर सुद्धा विशेष लक्ष देणार आहे.

हेही वाचा :

यांचेही संशयाचे “राज”कारण

विधानभवन प्रशासनाचा ४०० कर्मचाऱ्यांना दणका, केली मोठी कारवाई

कोल्हापूर : छत्रपती राजाराम महाराज सारथी योजनेतून तब्बल 70 कोटी 8 लाख रुपये शिष्यवृत्तीचे विद्यार्थ्यांना वितरण