नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या मोदी सरकारच्या तिसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प(Budget 2025) सादर करत आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. महागाई कमी करण्यासाठी आणि टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जातील, अशी शक्यता आहे. असे असताना आता पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर अनेक तरतूदी यामध्ये करण्यात आल्या आहेत.
शहरांच्या विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद केली जाणार आहे. 50 नवी पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहेत. खाजगी क्षेत्राला गती शक्ती डेटा पुरवणार आहे. देशातील 40 हजार नागरिकांच्या घरांचे स्वप्न 2025 मध्ये पूर्ण होणार आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात(Budget 2025) सात मोठ्या घोषणा होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामध्ये करात सूट, मध्यमवर्ग, महिला आणि शेतक्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. सर्वात जास्त लक्ष शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणांकडे लागले आहे. शेतकऱ्यांना विनाक्रेडिट कर्ज देणाऱ्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्पाचे वाचन करत आहेत. या बजेटमधून सर्व सामान्य आणि प्रत्येक क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वात देश बळकट होईल, असे म्हटले आहे. उद्योग, आरोग्य, ऑटोमोबाईल, तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
यांचेही संशयाचे “राज”कारण
विधानभवन प्रशासनाचा ४०० कर्मचाऱ्यांना दणका, केली मोठी कारवाई
कोल्हापूर : छत्रपती राजाराम महाराज सारथी योजनेतून तब्बल 70 कोटी 8 लाख रुपये शिष्यवृत्तीचे विद्यार्थ्यांना वितरण