Budget 2025: शेतीमाल निर्यातदारांसाठी कार्गो सिस्टीम युझर फ्रेंडली

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारताचा अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेतीविषयक(agricultural) उदयोगांवर विशेष घोषणा करत आहे. शेती हा भारताचा कणा आहे असे त्यानी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले आहे. तसेच शेतीमाल निर्यातदारांसाठी कार्गो सिस्टीम युझर फ्रेंडली आहे, असेही त्या म्हणाल्या.

शेतीमधील(agricultural) कार्गो सिस्टीम म्हणजे विविध प्रकारच्या वाहतुकीचा वापर करून कृषी उत्पादने आणि उपकरणे निर्यात करणे. ही सिस्टीम शेतकऱ्यांना आपले उत्पादन जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत करेल.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारताचा अर्थसंकल्प सादर करत आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शेअतकऱ्यांसाठी विशेष घोषणा केली आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत देऊन पुरवठा करणार अशा महत्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

याव्यतिरिक्त, सरकार डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू करणार आहे. तसेच फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्षकेंद्रित करणार आहे. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांवर लक्ष देणार. शेतीमधील उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. कापूस आणि मखाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्रीनी सांगितले आहे.

हेही वाचा :

देशभरातील सर्व सरकारी शाळांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

Budget 2025 : शहरांच्या विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद केली जाणार

अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना लाख मोलाचं गीफ्ट; या योजनेची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली