उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये महिलेला केलं किस; व्हिडीओ तुफान व्हायरल

प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा एक व्हिडिओ(video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उदित नारायण लाईव्ह शोमध्ये महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओमध्ये (video)उदित नारायण ‘टिप टिप बरसा पाणी’ हे गाणं गात आहेत. गाणं गाता गाता ते त्यांच्या महिला चाहत्यांना गालावर किस करतात आणि एका महिलेला ओठावर किस करताना दिसत आहेत. 69 वर्षीय उदित नारायण यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये उदित नारायण ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणं गाताना आणि महिलांना किस करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये उदित नारायण यांच्या परफॉर्मन्सवेळी चाहते त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी स्टेजजवळ येताना दिसत आहे. यावेळी उदित नारायण खाली वाकून फॅन्ससोबत फोटो काढतात. दरम्यान, फोटो काढताना ते महिलांच्या गालावर किस करतात. त्यानंतर आणखी एक महिला फोटो काढताना तिच्या ओठांवर किस करताना स्पष्ट दिसत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी उदित नारायण यांच्यावर टीका केली आहे. काहींनी याला ‘घृणास्पद’ म्हटलं आहे, तर काहींनी ‘अनुचित’ म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी तर त्यांना ‘म्हातारे झालात, थोडी तरी लाज ठेवा’ असंही म्हटलं आहे.

उदित नारायण म्हणाले, ‘आम्हाला पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. आम्ही सभ्य लोकं आहोत. चाहते फक्त आमच्यावर प्रेम व्यक्त करत असतात. असं असताना या गोष्टीची चर्चा का करायची? गर्दीत बरेच लोकं आहेत आणि आमचे बॉडीगार्ड देखील आहेत. पण चाहत्यांना भेटण्याची संधी मिळतेय असं वाटतं म्हणून कुणी हात पुढे करतात तर कुणी हाताचं चुंबन घेतात… हा सगळा उत्साह आहे. याकडे एवढं लक्ष देऊ नका… असं म्हणत उदित नारायण यांनी स्पष्टीकरण दिल.

हेही वाचा :

गौतम अदानी यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून अर्थसंकल्प; खासदार संजय राऊतांचा घणाघात

उद्योगांना MSME च्या कक्षेत आणण्यासाठी नवे निकष; ५०० कोटी पर्यंतच्या उद्योगांना होणार लाभ

आमिर खानच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एंट्री; ‘या’ व्यक्तीला करतोय डेट