भाजपचा ‘मास्टर प्लॅन’…, आयकरात सूट देऊन मध्यमवर्गीयांची जिंकली मने! आता… 

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन कर प्रणालीनुसार, आतापर्यंत ७ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना प्राप्तिकरातून सूट होती(political), आता १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.

पगारदार वर्गातील व्यक्तींना या व्यतिरिक्त ७५,००० रुपयांच्या मानक वजावटीचा लाभ देखील मिळेल आणि अशा प्रकारे १२.७५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या पगारदार व्यक्तीला आयकर भरावा लागणार नाही. तथापि, जे वर्षभरात यापेक्षा जास्त कमाई करतात त्यांना कर आकारला जाईल.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय १८ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना ७०,००० रुपयांची करसवलत आणि १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या उत्पन्नदारांना ८०,००० रुपयांची करसवलत मिळेल. हे प्रस्ताव २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच २०२६-२७ या कर निर्धारण वर्षासाठी आहेत.

निर्मला सीतारमण यांनी शनिवारी कोणत्याही कर निर्धारण वर्षासाठी अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली. आयटीआर दाखल करण्याची वेळ मर्यादा सध्याच्या दोन वर्षांवरून चार वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे. यासोबतच, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील कर कपातीची मर्यादा दुप्पट करून १ लाख रुपये करण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली.

दरम्यान, गेल्या १० वर्षांपासून दिल्लीत आम आदमी(political) पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. पण त्यानंतरही गेल्या दोन वेळा लोकसभा निवडणुकीत भाजप दिल्लीतील सर्व जागा जिंकत आहे. असे मानले जाते की दिल्लीत १५ टक्के मतदार लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पसंती देतात. त्यापैकी सर्वात मोठा वर्ग मध्यमवर्गीय आहे. अशा परिस्थितीत, हे मत ‘आप’कडून भाजपकडे जाऊ शकते.

आम आदमी पक्षाप्रमाणे भाजपनेही अनेक मोफत योजना जाहीर केल्या आहेत. भाजप म्हणते की दिल्लीत सुरू असलेल्या मोफत योजना सुरूच राहतील. याशिवाय, भाजपने तयारीसाठी महिलांना दरमहा २५०० रुपये आणि तरुणांना १८००० रुपये देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दिल्ली निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील.

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी आणलेल्या १९४ कोटी रुपयांच्या वस्तू आतापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत. निवडणुका निष्पक्ष आणि सोयीस्करपणे पार पाडण्यासाठी तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिथे प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, पाळणाघर आणि आहार कक्ष अशा सुविधा असतील. आयोगाने १९४ कोटी रुपयांचा माल जप्त केला. निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोफत वस्तू जप्त करण्याची कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत, आयोगाने १७५ आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर १९४ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे.

हेही वाचा :

उद्योगांना MSME च्या कक्षेत आणण्यासाठी नवे निकष; ५०० कोटी पर्यंतच्या उद्योगांना होणार लाभ

आमिर खानच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एंट्री; ‘या’ व्यक्तीला करतोय डेट

उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये महिलेला केलं किस; व्हिडीओ तुफान व्हायरल