भविष्यवाणी वर्तवणाऱ्या बाबा वेंगा, नॉस्त्रेदमस, निकोलस आणि इतरांनी वर्तवलेल्या अनेक शक्यतांपैकी काही खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. परंतु, आता कुठल्याही ज्योतिषाने नव्हे तर खुद्द वैज्ञानिकांनीच(Scientists) एक हादरवून सोडणारे भाकीत केले आहे. या भीतीदायक इशाऱ्याने जगाची चिंता वाढवली आहे.

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनने प्रसिद्ध केलेल्या एका संशोधनानुसार, २०९९ पर्यंत युरोप खंडात उष्णतेच्या लाटेमुळे तब्बल ५८ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान बदलामुळे होणाऱ्या मृत्यूंचाच समावेश या संशोधनात करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा उष्माघातामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या अधिक असेल, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
भविष्यातील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावण्यासाठी संशोधकांनी(Scientists) युरोपमधील तब्बल ८५४ शहरांचा अभ्यास केला. वेळेवर योग्य ती खबरदारी न घेतल्यास ५८,२५,७४६ लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे सर्वाधिक मृत्यू बार्सेलोना शहरात होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापाठोपाठ रोम, नेपल्स आणि माद्रिद या शहरांचा क्रमांक लागतो. या संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. पियरे मॅसेलॉट यांच्या मते, त्यांचा अहवाल हा वाढत्या तापमानावर आणि हवामान बदलावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करतो. जर आपण योग्य वेळी योग्य पावले उचलली तर हवामान बदलाचे परिणाम टाळून लाखो लोकांचे प्राण वाचवता येतील.

या शतकाच्या शेवटी उष्णतेच्या लाटेने अनेक लोक मृत्युमुखी पडतील, असा इशारा वैज्ञानिकांनी(Scientists) दिला आहे. विशेषतः भूमध्य समुद्राभोवतीच्या देशांना याचा सर्वाधिक फटका बसेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल म्हणजे केवळ युरोपसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे.
शास्त्रज्ञांनी वर्तवलेले हे मृत्यू २०९९ पर्यंत होतील, असे असले तरी प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्त्रेदमस याने २०२५ या वर्षासाठी वर्तवलेली भविष्यवाणीही तितकीच भयावह आहे. बाबा वेंगा आणि नॉस्त्रेदमस या दोघांनीही २०२५ साठी सारखीच भविष्यवाणी केली असल्याने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
नॉस्त्रेदमसने २०२५ साठी वर्तवलेल्या अनेक धोकादायक अंदाजांपैकी एक म्हणजे अणु तळांवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता. आपल्या शतकाच्या पुस्तकात नॉस्त्रेदमसने तिसऱ्या महायुद्धाचा उल्लेख केला असून, युरोपमधील अणु तळांवर दहशतवादी हल्ले हे त्याचे मुख्य कारण ठरू शकते, असे म्हटले आहे.
नॉस्त्रेदमसच्या भविष्यवाणीचा अर्थ लावणाऱ्या केन बिस्ट यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, या दहशतवाद्यांना रशियाकडून शस्त्रे आणि प्रशिक्षण दिले जाईल. हे दहशतवादी सीरियातील वाळवंटात तब्बल १० वर्षे प्रशिक्षण घेऊन अणु लक्ष्यांवर हल्ला चढवतील. नाटोच्या अणु तळांना लक्ष्य करून युरोपच्या सामर्थ्याला मोठा हादरा देण्याचा या दहशतवाद्यांचा कट असेल. त्यानंतर रशिया आणि चीनची संयुक्त सेना भूमध्य समुद्रातून युरोपवर आक्रमण करेल, असाही धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
हवामान बदलाचे गंभीर परिणाम आणि भविष्यातील धोक्यांबाबत शास्त्रज्ञांनी दिलेला इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. त्यातच नॉस्त्रेदमसने २०२५ बाबत वर्तवलेल्या शक्यतेने या चिंतेत भर पडली आहे.
हेही वाचा :
“युतीला भरभरून मतं दिली, आता हद्दवाढीबाबत युतीच निर्णय घेईल”; काय म्हणाले सतेज पाटील
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचा धिंगाणा; मोबाईल टॉवरवर चढला अन्… Video Viral
भाजपचा ‘मास्टर प्लॅन’…, आयकरात सूट देऊन मध्यमवर्गीयांची जिंकली मने! आता…