लाडक्या बहिणींची धास्ती वाढली ! ‘या’ लाभार्थ्यांवर दाखल होऊ लागले गुन्हे

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत(yojana) लाभार्थ्यांची फेरतपासणी सुरू असून, पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या तसेच बनावट कागदपत्रांद्वारे लाभ घेतलेल्या महिलांविरोधात कारवाई केली जात आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काहींनी स्वयंस्फूर्तीने योजनेचा लाभ नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स (माजी ट्विटर) वर माहिती दिली आहे की, बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्या काही लाभार्थ्यांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जानेवारी 2025 पर्यंत या योजनेच्या सात हप्त्यांचे प्रत्येकी 1,500 रुपये प्रमाणे एकूण 10,500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र, पात्रतेची तपासणी सुरू असल्याने काही महिलांनी घाबरून लाभ नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.

बनावट लाभार्थ्यांवर कठोर कारवाई

योजनेच्या(yojana) अर्ज पडताळणी प्रक्रियेत स्थानिक अंगणवाडी सेविकांनी मोठी भूमिका बजावली आहे. सप्टेंबर महिन्यातच अर्ज तपासणीदरम्यान अपात्र आणि बनावट लाभार्थ्यांचा गैरप्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता अधिकृत चौकशी सुरू आहे.

महिला आणि बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक सहन केली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

लाभ सोडण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा अन्य कोणत्याही निकषांमुळे अपात्र ठरतात, अशा महिलांना लाभ सोडण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. काही महिलांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत, मात्र त्याबाबतची अधिकृत माहिती प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

राज्य सरकारची भूमिका सकारात्मक असून, पात्र महिलांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेपासून वगळण्याचे काम वेगाने सुरू आहे.

हेही वाचा :

पालकांनो, बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी ‘या’ स्मार्ट टिप्स नक्की वापरा!

ट्रेनमध्ये महिलांचा राडा झिंज्या पकडत तुंबळ हाणामारी व्हायरल VIDEO

Apple च्या भारतीय युजर्ससाठी खुशखबर; कंपनीने केली मोठी घोषणा