तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या(diesel) नवीन दरांची घोषणा केली असून, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले आहे. इंधनाच्या किमतीमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसते. परंतु, आज जाहीर झालेल्या नवीन दरांमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
शहर पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
सातारा ₹104.76 ₹91.25
सांगली ₹104.48 ₹90.79
कोल्हापूर ₹104.14 ₹90.66
अहमदनगर ₹104.59 ₹91.40
अकोला ₹104.22 ₹90.68
अमरावती ₹104.80 ₹91.37
औरंगाबाद ₹105.50 ₹92.03
भंडारा ₹105.08 ₹91.61
बीड ₹104.49 ₹91.33
बुलढाणा ₹104.88 ₹91.90
चंद्रपूर ₹104.10 ₹90.67
धुळे ₹104.62 ₹91.10
गडचिरोली ₹105.00 ₹91.57
गोंदिया ₹105.50 ₹91.95
हिंगोली ₹105.16 ₹92.30
जळगाव ₹105.20 ₹91.23
जालना ₹105.30 ₹92.30
लातूर ₹105.42 ₹91.83
मुंबई शहर ₹103.50 ₹90.30
नागपूर ₹104.50 ₹90.65
नांदेड ₹105.49 ₹92.30
नंदुरबार ₹104.81 ₹91.48
नाशिक ₹104.40 ₹91.70
उस्मानाबाद ₹104.78 ₹91.85
पालघर ₹103.75 ₹90.73
परभणी ₹105.50 ₹92.30
पुणे ₹104.14 ₹90.88
रायगड ₹103.96 ₹90.62
रत्नागिरी ₹103.96 ₹91.96
सिंधुदुर्ग ₹105.50 ₹92.30
सोलापूर ₹105.10 ₹91.23
ठाणे ₹103.68 ₹90.20
वर्धा ₹104.80 ₹91.44
वाशिम ₹105.05 ₹91.43
यवतमाळ ₹105.50 ₹92.30
सामान्य नागरिकांना दिलासा
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारानुसार पेट्रोल आणि डिझेलचे(diesel) दर बदलत असतात. यावर अतिरिक्त घटक म्हणजे स्थानिक कर, व्हॅट आणि मालवाहतूक शुल्क यांचा देखील प्रभाव पडतो. त्यामुळे, प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात.
आजच्या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्यामुळे सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा :
किसिंग वादानंतर गायक उदित नारायण यांनी व्यक्त केली भारतरत्नची इच्छा
दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली! साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घुन हत्या
एसटी महामंडळाचे रुपडे पालटणार! महाराष्ट्र एसटीमध्ये ‘कर्नाटक पॅटर्न’