जसप्रीत बुमराहचे हेल्थ अपडेट : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात जखमी झाला होता. त्यामुळे बुमराहने शेवटच्या कसोटी सामन्यातही गोलंदाजी केली नाही आणि त्याला स्कॅनसाठी सामन्याच्या मध्यभागी मैदान सोडावे लागले. आता बुमराहची इंग्लंडसोबतच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी(Champions Trophy) संघात निवड झाली आहे, मात्र त्याच्या खेळण्याबाबत अजूनही शंका आहे. आता बुमराहबाबत ताजे अपडेट समोर आले आहे.
जसप्रीत बुमराह नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) बेंगळुरू येथे गेला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो तंदुरुस्त आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाअंतर्गत वेगवान गोलंदाजाचे पुढील स्कॅन केले जातील. दुखापतीमुळे बुमराह इंग्लंडसोबतच्या टी-20 मालिकेतही खेळू शकला नाही.
दुखापतीनंतरही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी(Champions Trophy) निवड झालेला बुमराह या आठवड्यात वैद्यकीय संघाकडून स्कॅन आणि मंजुरी मिळाल्यानंतरच आयसीसी स्पर्धेत सहभागी होईल. अहवालात म्हटले आहे की बुमराह पुढील काही दिवस बेंगळुरूमध्ये असेल आणि एनसीए तज्ञ अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडे आपले मत पाठवेल.
टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले होते की, “बुमराहला पाच आठवडे विश्रांती घेण्यास सांगितले आहे आणि तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. आम्ही त्याच्या तंदुरुस्तीची वाट पाहत आहोत आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला वैद्यकीय पथकाकडून त्याच्या प्रकृतीबद्दल कळेल. “त्यावेळेस आम्हाला कदाचित थोडे अधिक कळेल, ते नक्की काय आहे आणि त्याची वैद्यकीय स्थिती काय आहे.” यासंदर्भात समजेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडिया आधीच जाहीर केली आहे. ज्यामध्ये जसप्रीत बुमराहचीही निवड झाली आहे. आता संघावर अंतिम शिक्कामोर्तब ११ फेब्रुवारीपर्यंत करावा लागणार आहे, त्यामुळे टीम इंडियाकडे अजून ८ दिवस बाकी आहेत.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सुरु असताना भारताचे नेतृत्व करताना सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सामन्यादरम्यान स्कॅनिंगसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर यावेळी त्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले होते त्यामुळे त्याला सामना सोडावा लागला होता. आता तो आगामी इंग्लडविरुद्ध होणारी मालिका खेळणार की नाही याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे.
हेही वाचा :
खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त…
किसिंग वादानंतर गायक उदित नारायण यांनी व्यक्त केली भारतरत्नची इच्छा
लाथ नव्हे, गोळ्या घालायला पाहिजे होत्या – चंद्रहार पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य