सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा आश्चर्याचा धक्का देणारे तर कधी मजेशीर अशा गोष्टी सोशल मीडियावर पाहायाला मिळतात. डान्स, रिल्स, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकांना नोटांवर काही ना काही लिहण्याची सवय असते. अशा संदेश लिहिलेल्या नोटा तुम्ही सोशल मीडियावर देखील पाहिल्या असतील. कधी कोणी प्रियकर(boyfriend)-प्रेयसीला मेसेज पाठवते, तर कधी कोणी त्यावर नंबर लिहून ठेवते. अशा अनेक भन्नाट असे मेसेज पाहायला मिळतात.
सध्या अशीच एक 50 रुपयांच्या नोटेवर लिहलेला मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये लिहलेला मेसेज गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला(boyfriend) पाठवला आहे. हा मेसेज सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. तुम्हाला माहितच आहे महाराष्ट्र प्रशासनाने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली होती. या योजने अंतर्गत महिला दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. याचे पैसे एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंकडून घेतले आणि त्यानंतर तिला ब्लॉक केले आहे.
आता हे पैसे परत घेण्यासाठी तरुणी बॉयफ्रेंडला कॉल करत आहे, मात्र बॉयफ्रेंडने तिला ब्लॉक केले आहे. यामुळे तिने नोटवर मेसेज लिहून पाठवला आहे या व्हायरल नोटवर “गणेश मला ब्लॉकमधून काढ. मी माझे लाडकी बहिणीचे पैसे तुला नवीन मोबाईल घेण्यासाठी दिलेत. तुच आता अस वागणार का माझ्याशी. मला नको सोडू रे. मला एकतरी कॉल कर. मी वाट बघते. तुझीच सोनाली-गणेश.” असे लिहिलेले आहे. ही नोट सध्या व्हायरल होत आहे.
ही नोट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून इन्स्टाग्रामवर @avaghaday_bhau या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, आता तो काय तुझे पैसे परत देत नसतो असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने ते व्याजसह रिटर्न घेणे विसरीस वाटते असे म्हटले आहे. आणखी एकाने म्हटले आहे की, गणेश बघ नाहीतर पुढच्या लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत बघ असे म्हटले आहे. अनेकांनी हा मेसेज गणेशपर्यंत पोहोचवण्याची धडपड सुरु केली आहे.
हेही वाचा :
AAI मध्ये २२४ रिक्त पदांसाठी सुवर्ण भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘हा’ कलाकार पुन्हा दिसणार मालिकेत?
पालकांचा आर्थिक भार वाढला! राज्यभरात स्कूल बसच्या शुल्कात 18 टक्के वाढ