केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील न्यायालयाने(court) योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींशी संबंधित एका फौजदारी खटल्यात हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.
केरळच्या औषध निरीक्षकांनी पतंजली आयुर्वेदची सहयोगी कंपनी असलेल्या दिव्य फार्मसीविरोधात ‘ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, 1954’ Act, 1954) च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला होता. विशिष्ट आजारांवर उपचार करण्यासाठी काही औषधांच्या जाहिरातींवर बंदी घालणाऱ्या कलम 3 चे उल्लंघन झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कलम 3 (डी) अंतर्गत अशा रोगांचे निदान, उपचार किंवा प्रतिबंध करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरातींवर बंदी आहे.
यापूर्वी पलक्कड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी-2 यांनी जामीनपात्र वॉरंट जारी केले होते, ज्यामध्ये बाबा रामदेव यांना 1 फेब्रुवारीला हजर राहणे आवश्यक होते. मात्र, ते हजर न झाल्याने न्यायालयाने(court) शनिवारी अजामीनपात्र वॉरंट बजावून 15 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले. या प्रकरणात दिव्य फार्मसीला पहिले आरोपी करण्यात आले आहे, तर आचार्य बालकृष्ण यांना दुसरे आणि बाबा रामदेव यांना तिसरे आरोपी करण्यात आले आहे.
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे पतंजली आयुर्वेदला यापूर्वीही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले आहे. आधुनिक औषध प्रणाली, विशेषत: ॲलोपॅथीचा अपमान केल्याबद्दल आणि आजारांवर उपचार करण्याबाबत चुकीचे दावे केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कंपनीविरोधात अवमान नोटीस बजावली होती. त्यानंतर बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर हे प्रकरण बंद करण्यात आले होते.
हेही वाचा :
रोहित शर्माची शेवटची वन डे मालिका?
ट्रम्प यांची ऑफर अन् एकाच वेळी 40 हजार कर्मचाऱ्यांचा राजीनामा
‘सिंग इज ब्लिंग’ फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई?, ‘ते’ फोटो तूफान व्हायरल