इचलकरंजी: दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजी येथे शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून बारावीनंतर पाच वर्ष आणि पदवीनंतर तीन वर्षांचा लॉ डिग्री कोर्स सुरू होत आहे. या कोर्ससाठी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना एमएच-सीईटी संबंधित मार्गदर्शन देणारी एक कार्यशाळा(Workshop) आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे आयोजन शनिवार, 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता महाविद्यालयात होणार आहे.

कार्यशाळेच्या(Workshop) पहिल्या सत्रात एमएच-सीईटी लॉ स्टडी प्लॅन अँड करिअर अपॉर्च्युनिटी या विषयावर एडवोकेट प्रीती पटवा यांचे मार्गदर्शन होणार आहे. या सत्रात लॉ अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या टिप्स व करिअरच्या संधींविषयी विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती मिळेल. दुसऱ्या सत्रात प्राध्यापक नरेंद्र शिंदे (से.नि.) भारती विद्यापीठ कोल्हापूर हे लॉ प्रवेश परीक्षा एमएच-सीईटी लॉ नोंदणीपासून प्रवेश प्रक्रियेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन व पुढील संधी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना एमएच-सीईटी लॉ परीक्षा आणि लॉ क्षेत्रातील करिअर संधींबाबत स्पष्ट माहिती देणे आहे. या कार्यशाळेचा लाभ इचलकरंजी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी घेण्याचे आव्हान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर चंद्राणी बागडे यांनी केले आहे.
महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केलेली ही कार्यशाळा त्यांच्या करिअरच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा :
कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्या बंद करा, अन्यथा…; अजित पवारांनी भरला दम
BSNL च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; कंपनीने आणले सर्वात स्वस्त प्लॅन
रांझा तेरा हीरिये: व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार नवीन रोमँटिक गाणं