कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ज्यांनी लोकांना दिलेल्या कर्जाची “गहाण खते” इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून शेतजमिनी त्यांना परत केल्या, शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले त्या संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या आजच्या अकराव्या वंशाला कर्जाचे ओझे पेलवेना म्हणून आत्महत्या(Suicide) करावी लागली. हरिभक्त परायण कीर्तनकार शिरीष महाराज मोरे असे तुकोबांच्या या वंशाचे नाव आहे. सर्वसामान्य जनतेला अध्यात्म सांगणाऱ्या, त्यांना भक्ती मार्गाची दिशा दाखवणाऱ्या व्यक्तींनीही शेवटचे टोकाचे पाऊल उचलावे, पलायनवाद स्वीकारावा याबद्दल आश्चर्यच नव्हे तर सखेदाश्चर्य वाटावे. प्रवचनकार आणि अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनीही काही वर्षांपूर्वी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली होती, मात्र त्याचे आर्थिक विवंचना हे कारण नव्हते.

तुकोबांचे जन्म आणि कर्मस्थान म्हणजे देहुगाव. या पवित्र स्थानाला भाविक मोठ्या संख्येने येत असतात. वारकरी संप्रदाय इथे मोठा आहे. शिरीष महाराज मोरे हे याच गावात राहतात. तुकोबारायांचे ते अकरावे वंशज म्हणून मोरे घराण्याकडे
मोठ्या आदराने पाहिले जाते. कीर्तनकार यांची परंपरा या घराण्याला आहे. शिरीष महाराज मोरे हे तरुण कीर्तनकार म्हणून साऱ्या महाराष्ट्राला परिचित होते.
ते लवकरच वैवाहिक आयुष्यात पदार्पण करणार होते. दोन महिन्यापूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता. आता तिच्या आयुष्याचा काय? आपण एका तरुणीला तुझ्याशी मी लग्न करणार आहे, तुझ्यासोबत वैवाहिक जीवनाला प्रारंभ करणार आहे असा आश्वासक शब्द धार्मिक विधीपूर्वक दिला आहे याचे या कीर्तनकाराला विस्मरण व्हावे हेच दुर्दैवी म्हणावे लागेल.
शिरीष महाराज मोरे यांनी मृत्यूपूर्वी, आत्महत्या(Suicide) करण्यापूर्वी सुसाईड नोट्स मागे ठेवल्या आहेत. त्यातून ते कर्जबाजारी होते, आर्थिक अडचणीत होते, या समस्यांवर वास्तविक त्यांना समाधान शोधता आले असते.
साक्षात देवांनीही कुणाकडून तरी कर्ज घेतले होते, तिरुपतीच्या डोंगरावर निवासस्थान असलेल्या बालाजीलाही भल्या मोठ्या कर्जाला सामोरे जावे लागले होते, त्याचे कर्ज अजूनही फिटत नाही किंवा फिटलेले नाही, जगातील सर्वात श्रीमंत
देवस्थान असलेल्या तिरुपतीच्या डोंगरावर जाऊन लाखो भाविक बालाजीच्या तिजोरीत म्हणजेच दानपेटीत करोडो रुपये टाकत असतात आणि तरीही तो कर्जमुक्त होत नाही अशी गोष्ट या महाराष्ट्रातील कीर्तनकारच आपल्या पूर्व रंगात सांगत असतात. प्रवचनकार निरूपणात सांगत असतात.
कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांना ही गोष्ट माहीत नाही असे कोणीही म्हणणार नाही. भक्ताची कोणतीही समस्या मग ती आर्थिक असो किंवा अन्य असो ती भगवंत सोडवत असतो असे कीर्तनकारच श्रोत्यांना भाविकांना सांगत असतात.
प्रश्न कोणताही असो, संकट कोणतेही असो त्यावर समाधान हे असतेच. उत्तर असतेच(Suicide). शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या कीर्तनात सांगितलेले असेलच किंवा सांगितलेले आहे. पण तरीही हा तरुण कीर्तनकार टोकाचा निर्णय घेतो, ऐन तारुण्यातच या जगाचा निरोप घेतो याचेच आश्चर्य वाटते.
आपल्यावर आलेले संकट किंवा अचानक उभा राहिलेला यक्षप्रश्न याबद्दल संबंधितांनी आपल्या मित्रांजवळ, कुटुंबीयांजवळ
मोकळेपणाने व्यक्त झाले पाहिजे. त्यातून प्रश्नाचे उत्तर मिळू शकते किंवा संकटाशी सामना करण्याचे धैर्य मिळते.
कीर्तनकार म्हणून शिरीष महाराज मोरे यांनी हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले असेल पण त्यांच्याजवळ आपले मन त्यांना मोकळे करता कसे येऊ शकेल? याचा अर्थ त्यांना जवळचे मोकळे व्हावे किंवा व्यक्त व्हावे असे मित्र नसावेत.

संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचे वडील मोठे सावकार होते. त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज दिली होती. आणि त्यांच्याकडून “गहाण खत” लिहून घेतले होते. वडील वारल्यानंतर तुकोबारायांनी ही सर्व गहाण खते इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकली होती. “उदासे विचारे वेच करी”इतक्या सहजपणे त्यांनी शेतकऱ्यांना मुक्त केले होते.
पण हेच तुकोबाराय आर्थिक अडचणीत आले होते तेव्हा त्यांच्या पत्नी जिजाई यांनी त्यांच्या वडिलांच्या ओळखीचे असलेल्या सावकारांच्या कडून 200 रुपयांचे कर्ज घेतले होते(Suicide). या दोनशे रुपयांमध्ये त्यांनी मिठाचा व्यापार केला. त्यात व्यापारात त्यांना शंभर रुपयांचा नफा मिळाला. तीनशे रुपये घेऊन ते घराकडे निघाले होते. वाटेत त्यांना एक एक कर्जबाजारी भेटला. त्याची ती अवस्था पाहून तुकोबारायांनी त्यांला त्यांच्याकडे असलेल्या तीनशे रुपयांतील अडीचशे रुपये देऊन टाकले. नंतरच्या मार्गात उर्वरित पन्नास रुपये सुद्धा त्यांनी असेच लोकांना देऊन टाकले.
रिकाम्या हाताने जिजाईला तोंड कसे दाखवायचे म्हणून, ते डोंगरावर जाऊन विठोबाच्या नामसंकीर्तनात गुंग झाले. पण त्यांचे हे कर्ज विठू माऊलीने परस्पर फेडले असा दृष्टांत अनेक कीर्तनकार श्रोत्यांना देत असतात. शिरीष महाराज मोरे यांनी आपले पूर्वज असलेल्या तुकोबारायांचा हा दृष्टांत त्यांच्या कीर्तनात सांगितलेला नाही असे म्हणू शकणार नाही. पण तरीही आर्थिक विवंचना अनेक कर्जाचा डोंगर यातून काही मार्ग निघत नाही म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. आणि आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्या या पलायनवादाचे समर्थन कोणीही करणार नाही.
हेही वाचा :
मोठी बातमी! अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी
राजकारणात पुन्हा भूकंप होणार, ठाकरे गट फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेस होणार
दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजी येथे लॉ प्रवेश यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन