“उदित नारायणचा नवीन किस व्हिडीओ: वादात आणखी एक धमाका!”

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या चर्चेत आहेत. चर्चेत राहण्याचे कारण (celebrity singer)म्हणजे नुकताच व्हायरल झालेला त्यांचा एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये गायक एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका महिला चाहतीच्या ओठांवर चुंबन घेताना दिसत आहेत.या घटनेनंतर गायकावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. हा वाद संपत नाही तोच गायकाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्येही ते  एका महिला चाहतीला किस करताना दिसत आहे. तर एका जुन्या व्हिडिओमध्ये उदित नारायण यांनी स्टेजवर श्रेया घोषाल आणि अलका याग्निक यांनाही अचानक ‘किस’ केले होते.

गायकाला नुकतेच एका महिला चाहतीला किस केल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, उदित नारायण यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला फोटो काढण्यासाठी उदित नारायण यांना तिच्याजवळ बोलावते. त्यानंतर उदित आधी त्या महिलेच्या गालावर किस करतात आणि नंतर तिच्या ओठांवर किस करतात.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून पुन्हा एकदा गायकाला ट्रोल केले जात आहे. उदित नारायण यांच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही (celebrity singer)लोक त्यांना ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘भाई, हे खूप पुढे गेले आहेत.’ दुसऱ्याने गंमतीत म्हटले, ‘इथे प्रकरण घसरले.’ आणखी एका यूजरने लिहिले, ‘अरे, हे तर ठरकी आहेत.’ दुसऱ्या एका यूजरने लिहिले, ‘तो एक सिरीयल किसर आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘सिरियल किसर इम्रान हाश्मी.’

यापूर्वी गायकाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. उदित नारायण एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये “टिप टिप बरसा पानी” गाण्यावर परफॉर्म करत होते, तेव्हा काही महिला चाहत्या त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी स्टेजजवळ आल्या. सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्यानंतर गायकाने (celebrity singer)यावर प्रतिक्रिया दिली की, “आम्ही असे नाही, आम्ही सभ्य लोक आहोत. कॉन्सर्टदरम्यान कोणी गळाभेट घेतो, कोणी हाताचे चुंबन घेतो. हे सर्व प्रेमळ वेड असते. याकडे जास्त लक्ष देऊ नये.”

हेही वाचा :

मोठी बातमी! अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी

राजकारणात पुन्हा भूकंप होणार, ठाकरे गट फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेस होणार

दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजी येथे लॉ प्रवेश यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन