उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी होणाऱ्या या (mahakumbh)मेळ्यासाठी जगभरातून लोक दाखल होत आहेत. नागा साधू, तपस्वी यांच्यासह करोडो भाविक हे महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होत आहेत. करोडो लोकांनी अमृतस्नान केले असून अजूनही लाखो लोक अजूनही प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच हौशी तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी केलेला प्रवास चर्चेचा विषय ठरत आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2025/02/image-128-1024x1024.png)
प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याला भाविकांची गर्दी वाढत असल्याने अधिकच्या रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहे. तसेच प्रयागराजमध्ये इतर बाहेरील गाड्यांना आतमध्ये येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. महाकुंभमेळ्यामध्ये यात्रेकरूंची मोठ्या संख्येने गर्दी वाढली आहे आणि (mahakumbh)सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका तरुणीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी चक्क रेल्वेच्या टॉयलेटमध्ये प्रवास केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या विचित्र व्हिडिओमध्ये तरुणी रेल्वेच्या टॉयलेटमध्ये उभे राहून प्रवास करत आहेत. त्यांच्यासोबत इतर देखील काही मित्र असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तरुणी रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असल्याचे सांगत आहेत. महाकुंभला जाणाऱ्या रेल्वे या पूर्ण प्रवाशांनी भरलेल्या असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. प्रवाशांची खचाखच भरलेल्या रेल्वेमध्ये गर्दीतून थोडे वेगळे होता यावे म्हणून ही तरुण मंडळी चक्क रेल्वेच्या टॉयलेटमधून प्रवास करत आहे. प्रचंड गर्दीमुळे त्यांनी शौचालयात प्रवास करणे पसंत केले. तर व्हिडिओमध्ये तरुणी म्हणत आहे की, “मित्रांनो, आपण ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आहोत आणि कुंभमेळ्याला जात आहोत,” ती शौचालयामध्ये व्हिडिओ काढत असून कमोडवर उभी असल्याचे दाखवत आहे.
व्हिडिओमध्ये ती तरुणी तिच्या मैत्रिणीला शौचालयाचा दरवाजा न उघडण्यास सांगते आणि बाहेर उभ्या असलेल्या लोकांची थट्टा करते. ७,००,००० हून अधिक व्ह्यूज(mahakumbh) मिळालेल्या या व्हिडिओने अनेक नेटकऱ्यांना नाराज केले. नेटकऱ्यांनी शौचालयाचा असा गैरवापर आणि ट्रेनमधील इतर प्रवाशांना त्रास देत आत व्हिडिओ शूट करताना पाहून धक्का बसला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी यावरुन तरुणींना धारेवर धरले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच तरुणींना खडेबोल सुनावले आहेत. “काही लोकांना नागरी जाणीव नाही. भारताचा विकास असाच होणार आहे का?”, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला. तर या तरुणींने सर्व कमेंट्सला प्रत्युत्तर देत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
हेही वाचा :
थरारक व्हिडिओ! भरधाव ट्रक डोक्यावरून गेल्यावरही तो जिवंत, कसे घडले हे?
मुलींनी कसे करावे मुलांना प्रपोज? एकापेक्षा एक हटके Ideas
हिरवा वाटाणा अधिक काळासाठी कसा टिकवून ठेवावा?