प्रपोज करताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

प्रिय व्यक्तीला प्रपोज करणं म्हणजे या जगातला सर्वात अवघड आणि कठीण पेपर (proposal rings)सोडवण्यासारखं आहे, असं अनेकांना वाटतं. कोणाला तरी कोणीतरी पहिल्या भेटीत आवडायला लागतं तर कोणाला एखाद्याबरोबर काही वेळ घालवल्यानंतर एखादी व्यक्ती आवडायला लागते. या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातलं सांगताना भल्याभल्यांना भिती वाटते. पण प्रपोज करण्याआधी काही गोष्टींची जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे, कोणत्या आहेत या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या…

प्रेमाची जाणीव व्हायला लागली की, मनातल्या भावना सांगून टाकाव्यात असं म्हणतात. मात्र आपण ज्या व्यक्तीला प्रपोज करतोय त्या व्यक्तीबाबत आपल्याला प्रेम आहे की फक्त आकर्षण आहे हे समजणं देखील तितकच महत्त्वाचं आहे.प्रेम असणं आणि निभावणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. (proposal rings)एखादी व्यक्ती आपल्याला का आवडते आहे, याबाबतची नेमकी कारणं आपल्याला माहित असायला पाहिजेत. आपल्याला समोरच्या व्यक्तीबाबत आकर्षण आहे की खरंच तिच्या किंवा त्याच्याबद्दल काही वाटतं हे प्रपोज करण्याआधी आपणचं स्वत;याबाबत स्पष्ट असायला हवं.

बऱ्याचदा सोशलमीडियावरुन ओळख होते किंवा ऑफिस कॉलेजसारमध्ये एखादी व्यक्ती आवडली म्हणजे लगेच प्रेम झालं असा त्याचा अर्थ होत नाही. त्यासाठी स्वत:ला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रेमाला लग्नापर्यंत घेऊन जाण्याच्या विचारात आहात तर तुम्हाला त्या व्यक्तीशी (proposal rings)आधी मैत्री करणं अपेक्षित आहे.तसंच त्या व्यक्तीचा चांगला वाईट स्वभाव जाणून घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे.

या गोष्टींचा प्रपोज करण्याआधी विचार केला तर नातं फार काळ टिकण्यास मदत होते. प्रपोज करण्याआधी तुमच्याबाबत समोरच्या व्यक्तीला विश्वास देणं गरजेचं आहे. जर प्रपोजल स्विकारलं तर चांगलच मात्र नाही स्विकारलं तर नकार पटविण्याची तयारी असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

हेही वाचा :

थरारक व्हिडिओ! भरधाव ट्रक डोक्यावरून गेल्यावरही तो जिवंत, कसे घडले हे?

मुलींनी कसे करावे मुलांना प्रपोज? एकापेक्षा एक हटके Ideas

हिरवा वाटाणा अधिक काळासाठी कसा टिकवून ठेवावा?