शेवटी आईचं काळीज! लेकरासाठी स्वत:चा जीव घातला धोक्यात Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ(Video) आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. याशिवाय, अनेक अपघातांचे थरकाप उडवणारे व्हिडिओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.

यातील काही व्हिडिओ आपल्याला अनेकदा आश्चर्यात पाडतात. सध्या कोणावर कधी वाईट प्रसंग येईल सांगणे कठीण आहे. मग अशा अपघातांच्या वेळी कोणी ना कोणी सुपरहिरो असतो जो अपघातग्रस्त लोकांची मदत करतो. असे व्हिडिओ देखील प्रचंड वेगाने व्हायरल होतात. सध्या असाच एक सुपरहिरोचा नाही तर सुपर मॉमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्हाला माहिततच असेल आईसाठी आपली मुले स्वत:च्या जीवापेक्षाही महत्त्वाची असतात. वेळ प्रसंगी आपल्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी ती स्वत:चा जीव धोक्यात घालायलाही मागे पुढे बघत नाही. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ असचा काहीसा आहे, जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. एका इलेक्ट्रिक एक्सलेटवर भयकंर अपघात घडला असून आईने आपल्या मुलाचा जीव आधी वाचवला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये(Video) तुम्ही पाहू शकता की, एक महिला आपल्या मुलाला घेऊन इलेक्ट्रिक एक्सलेटरवरुन चढत आहे. याच वेळी एक्सलेटरवरुन उतरताना अचानक एक्सलेटरचा अर्धा भाग काली पडण्यास सुरुवात होते. पण आईच्या सावधपमाने मुलाचे प्राण वाचतात. ती पटकन मुलाला उचलून पुढे उभे असलेल्या लोकांच्या हातात देते जे त्या चिमुकल्याला घेऊन मागे सरकतात.

मात्र, आई एक्सलेटरमध्ये अडकते हे पाहून लोक तिच्या मदतीला धावून येतात. मात्र, तिला वाचवण्यात अपयश येते. ती एक्सलेटरच्या तुटलेल्या भागांत पडकते. हा अपघात इतका भयंकर आहे की पाहून कोणालाही धक्का बसेल. पण आईच्या या बलिदानामुळे त्या चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत.

सध्या हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @bozan.0202 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी दुख व्यक्त केले आहे. अनेकांनी खूप वाईट झाले असे म्हटले आहे, तर काहींनी आई नेहमी आपल्या आधी मुलांचा विचार करते असे म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

हेही वाचा :

आर्चीसोबत लग्न करणार का? कृष्णराज महाडिकांनी खरं खरं सांगून टाकलं

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यावर…

शेजाऱ्याचे आपल्या आईसह प्रेमसंबंध, मुलाने काटा काढण्यासाठी लावला इलेक्ट्रिक ट्रॅप, पण…