अमूल दूधाच्या किंमतीत घट?, जाणून घ्या नवे दर

देशभरात दूधाच्या(milk) किंमती सातत्याने वाढत असताना, आता ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. अमूल कंपनीने आपल्या गोल्ड, ताजा आणि टी स्पेशल दूधाच्या किंमती कमी केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत दुधाच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने ग्राहकांवर आर्थिक ताण वाढला होता, मात्र अमूलच्या नव्या निर्णयामुळे सामान्य लोकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

अमूलने किती घटवले दूधाचे दर?
अमूल(milk) कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक जायेन मेहता यांनी सांगितले की, फक्त 1 लीटरच्या पॅकमध्ये ₹1 प्रति लीटर कपात करण्यात आली आहे. मात्र, 500ml पॅकच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नवीन अमूल दूध दर
अमूल गोल्ड (Amul Gold) 1 लीटर: ₹66 ➝ ₹65
अमूल टी स्पेशल (Amul Tea Special) 1 लीटर: ₹62 ➝ ₹61
अमूल ताजा (Amul Taaza) 1 लीटर: ₹54 ➝ ₹53
अमूल फ्रेश 1 लीटर: ₹54 ➝ ₹53
जून 2024 मध्ये अमूलने दर वाढवले होते

गेल्या वर्षी, जून 2024 मध्ये अमूलने आपल्या दूधाच्या दरात ₹2 प्रति लीटर वाढ केली होती.

अमूल गोल्ड 500ml: ₹32 ➝ ₹33
अमूल गोल्ड 1 लीटर: ₹64 ➝ ₹66
अमूल ताजा 500ml: ₹26 ➝ ₹27
अमूल शक्ति 500ml: ₹29 ➝ ₹30

अन्य दूध उत्पादक कंपन्यांवर दबाव?
अमूलच्या या दरकपातीमुळे इतर डेअरी कंपन्यांवरही दर कमी करण्याचा दबाव वाढू शकतो. अमूलच्या निर्णयामुळे बाजारात स्पर्धा वाढेल आणि ग्राहकांना अधिक किफायतशीर दरात दूध मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

पाच वर्ष लहान क्रिकेटपटूच्या नेतृत्वाखाली कोहली करणार ‘विराट’ खेळी

आता नवीन इलेक्ट्रिक बसेस येणार सेवेत; लांबचा प्रवास होणार सुकर

साईरत्न एंटरटेन्मेंटवर प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं “एक चांदण्याची रात” हे गीत प्रदर्शित