बड्या चित्रपटासाठी मोनालिसाला आली ऑफर, मिळणार ‘एवढ्या’ लाखाचं मानधन

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभाची चर्चा संपूर्ण जगभर होत आहे. लाखो भाविक गंगास्नानासाठी येत आहेत, पण या कुंभमेळ्यात एक मोनालिसा नावाची मुलगी सोशल मीडियावर इतकी व्हायरल झाली की तिचं नशीबच बदलून गेलं. महाकुंभात रुद्राक्ष विकण्यासाठी आलेली मोनालिसा काही क्षणांत इंटरनेट सेंसेशन बनली आणि आता तिला थेट बॉलिवूड चित्रपटात(film)मुख्य भूमिका मिळाली आहे.

मोनालिसाची व्हायरल छायाचित्रे पाहून प्रसिद्ध दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी तिला आपल्या आगामी “द मणिपुर डायरीज”चित्रपटात(film) मुख्य भूमिकेसाठी निवडले आहे. अहवालानुसार, या चित्रपटासाठी मोनालिसाला 21 लाख रुपयांचे मानधन मिळत आहे.

मोनालिसाच्या सौंदर्याने आणि साधेपणाने लाखो लोकांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय बनल्यानंतर सनोज मिश्रा तिला भेटण्यासाठी थेट महेश्वर येथे पोहोचले आणि तिला चित्रपटासाठी साइन केले. आता मोनालिसा मुंबईत दाखल झाली असून, तिथे ती अभिनयाचे प्रशिक्षण घेत आहे.

महाकुंभात ती फक्त रुद्राक्ष विकण्यास आली होती, पण लोक तिच्या सौंदर्यावर इतके फिदा झाले की ती अचानक स्टार बनली. लोकांनी तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तिला घेरायला सुरुवात केली आणि या अफाट प्रसिद्धीमुळे तिला मध्यप्रदेशमध्ये परतावं लागलं.

आता मोनालिसा मुंबईत आहे आणि तिच्या पहिल्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. तिच्या यशस्वी प्रवासावर चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावर ती चर्चेत आहे.

कधीही बदलू शकते नशिबाची वाट
मोनालिसाची कहाणी सिद्ध करते की कधी, कुठे आणि कशामुळे नशीब बदलेल, हे सांगता येत नाही. महाकुंभात रुद्राक्ष विकणारी एक सामान्य मुलगी आज बॉलिवूडमध्ये हिरोईन बनणार आहे.

सिंहाचा रुद्रावतार! घरातून खेचत नेलं अन्… थरारक Video Viral

आणखी एक आनंदवार्ता! आम आदमी सुखावला; महागाई 5 महिन्यांत सर्वात कमी..

तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाची मागणी; पोलिसांत दिली तक्रार