भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने गुगल क्रोम ब्राउझर (google ads)वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. जे वापरकर्ते विंडोज किंवा मॅकओएसवर हे ब्राउझर वापरतात, त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गुगल क्रोम वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगायला हवी. ब्राउझरमधील त्रुटींमुळे वापरकर्त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. ह्या त्रुटी प्रामुख्याने एक्सटेंशन API च्या सदोष अंमलबजावणीमुळे आणि स्किया, V8 मध्ये ‘फ्री’च्या चुकीच्या वापरामुळे उद्भवतात, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सायबर गुन्हेगार आणि फसवणूक (google ads)करणारे या त्रुटींचा गैरफायदा घेऊ शकतात.

Google Chrome Users l संभाव्य मोठे नुकसान :
क्रोम ब्राउझरमधील या सध्याच्या त्रुटी ब्राउझरच्या अत्यंत महत्त्वाच्या भागांमध्ये सापडल्या आहेत. यामुळे युजर्सचे मोठे नुकसान होऊ शकते. ह्यात दूरस्थ हल्लेखोर, कोणत्याही (google ads)प्रत्यक्ष संपर्काशिवाय, युजर्सच्या डिव्हाइसला लक्ष्य करू शकतातह्या हल्ल्यांसाठी, विशेषरित्या तयार केलेल्या वेबपेजेसचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर, युजर्सची वैयक्तिक माहिती चोरणे, ओळख चोरणे, आणि बँक खाती रिकामी करण्यासारख्या फसव्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. वापरकर्त्यांनी त्यांचे ब्राउझर त्वरित अपडेट करणे आवश्यक आहे. ब्राउझर आपोआप अपडेट होत असले, तरी वापरकर्त्यांनी स्वतःहून अपडेट तपासावे. Linux वरील 133.0.6943.53 पूर्वीचे आणि Windows किंवा Mac वरील 133.0.6943.53/54 पूर्वीचे Chrome व्हर्जन धोकादायक श्रेणीत येतात. अपडेट उपलब्ध नसल्यास, वापरकर्त्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
हेही वाचा :
राष्ट्रवादीचे माजी आमदार यांच्या अपघाताचा व्हिडीओ समोर!
केस ओढले, मारहाण केली, शिवाय आक्षेपार्ह…’त्या’ दिवशी काय घडलं?, ऐश्वर्याचा मोठा खुलासा
IPL 2025 ची सुरुवात कधी पहिल्या सामन्यासाठी दोन संघ ठरले संपूर्ण वेळापत्रक जाहीर