तारखेआधीच मासिक पाळी येण्याची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

दर महिन्याला येणारी पाळीही प्रत्येक महिलेसाठी अगदी सामान्य आहे. साधारणपणे (period cramp relief)पीरियड्स सायकल ही 28 ते 35 दिवसांची असते. तर दर महिन्याला मासिक पाळी काही दिवस पुढे-मागे अशीही येत असते. याचा अर्थ असा होत नाही की मासिक पाळी ही दर महिन्याला त्याच तारखेला येईल. कधीकधी एक किंवा दोन दिवस आधी येऊ शकते, कधीकधी एक किंवा दोन दिवसानंतर देखील येते. परंतु असे वारंवार दरमहिन्याला तारखे आधीच किंवा तारखेनंतर येत असेल तर हे चिंताजनक असू शकते.

कारण दर महिन्याला वेळेवर मासिक पाळी येणे हे स्त्रीच्या लैंगिक आरोग्याचे लक्षण आहे. मात्र हा काळ महिलांसाठी अनेकदा वेदनादायी असतो परंतु मासिक पाळी महिन्याच्या तारखेपेक्षा लवकर येणे किंवा खूप मोठ्या गॅपने पाळी येणे यामागचे नेमकं कारण काय असू शकतं. फक्त हार्मोन्सच्या (period cramp relief)असंतुलनामुळे हे होते की इतरही काही गोष्टी यासाठी कारणीभूत असतात हे लक्षात घ्यायला हवे. पाहूयात मासिक पाळी लवकर येण्यामागची नेमकी कारणे कोणती…

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किंवा व्यस्त जीवनशैलीमुळे याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. तसेच इतर कोणत्याही कारणामुळे तुमच्या वजनात अचानक बदल होत असतील, जसे की अचानक वजन वाढणे किंवा झपाट्याने वजन कमी होणे, तर हे स्त्रियांमधील हार्मोनल असंतुलनामुळे अनियमित मासिक पाळी येत असते.

थायरॉईड असणे
थायरॉईड तुमच्या शरीरातली संप्रेरकांचे संतुलन नियंत्रित करते. जर एखाद्या महिलेला थायरॉईडचा आजार असेल तर त्याच्या परिणामामुळे त्या महिलेची मासिक पाळी (period cramp relief)वेळे आधी किंवा वेळे नंतर अनियमित होण्याची शक्यता असते.

पीसीओएस
PCOS किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम ही एक सामान्य स्थिती आहे जी 10 पैकी 1 महिलांना प्रभावित करू शकते. PCOS मुळे महिलेच्या शरीरात हार्मोनल असंतुलन देखील होऊ शकते ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊन वेळे आधीच लवकर येऊ शकते.

तारुण्य
तारुण्यवस्थेतील सुरुवातीच्या काळात मासिक पाळीतील अनियमितता दिसून येते. त्या वेळी, शारीरिक आणि हार्मोनल बदल एकाच वेळी होतात, म्हणून मासिक पाळी कधी खूप लवकर येते तर कधी उशीरा. हे सामान्य आहे.

तणाव
अनेकदा कामाच्या तणावामुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मासिक पाळीवर होतो. अशा परिस्थितीत मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि वेळेच्या आधीही येऊ शकते.

हेही वाचा :

राष्ट्रवादीचे माजी आमदार यांच्या अपघाताचा व्हिडीओ समोर!

केस ओढले, मारहाण केली, शिवाय आक्षेपार्ह…’त्या’ दिवशी काय घडलं?, ऐश्वर्याचा मोठा खुलासा

IPL 2025 ची सुरुवात कधी पहिल्या सामन्यासाठी दोन संघ ठरले संपूर्ण वेळापत्रक जाहीर