भारतीय आयुर्विमा महामंडळाने MarTech प्लॅटफॉर्म लाँच(launches) केला आहे. कंपनीने आपल्या DIVE या प्रकल्पांतर्गत हे लॉन्च केले आहे. त्यामुळं आता सर्वसामान्यांचे विम्यासंबंधीचे काम सहज होणार आहे. त्यासोबतच विमा क्षेत्रात महामंडळाची विश्वासार्हता आणखी वाढणार आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तरक माहिती.

सरकारी मालकीच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. हे व्यासपीठ LIC च्या डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोजेक्ट ड्राइव्हने घेतलेला पहिला पुढाकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे विम्यासंबंधीचे काम सहज होणार असून, त्यासोबतच विमा क्षेत्रात महामंडळाची विश्वासार्हता आणखी वाढणार आहे(launches). यामुळं एलआयसीला बळकटी मिळणार आहे.
मार्केटिंग टेक्नॉलॉजी, किंवा “मार्टेक”, ही एक संज्ञा आहे, जी व्यवसाय त्यांच्या मार्केटिंग प्रयत्नांना स्वयंचलित, सुव्यवस्थित आणि ऑप्टिमाइझ करण्यासाठी वापरू शकतात, अशा प्लॅटफॉर्म, साधने आणि तंत्रज्ञानाच्या श्रेणीचा संदर्भ देते. मार्केटिंग प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि लवचिक बनवून मार्केटर्सचे काम सोपे करणे हे मार्टेकचे ध्येय आहे. आजच्या डिजिटल जगात, तंत्रज्ञान तुम्हाला ब्रँड जागरूकता वाढवण्यास, विक्री वाढवण्यास आणि ग्राहकांची निष्ठा वाढविण्यास मदत करु शकते.

विमा क्षेत्रातील कंपनीचे जागतिक स्तरावरील स्थान मजबूत करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. LIC चे MD आणि CEO सिद्धार्थ मोहंती म्हणाले की, MarTech प्लॅटफॉर्म लाँच करून LIC ने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक नवीन झेप घेतली आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे, पॉलिसीधारक अधिक सोप्या पद्धतीने एजंटशी संपर्क साधू शकतील.
MarTech ही केवळ तांत्रिक नवकल्पना नाही. उलट, हा एक धोरणात्मक बदल आहे जो LIC ला डिजिटल इन्शुरन्स इनोव्हेशनमध्ये जागतिक स्तरावर स्थान निर्माण करेल. यामुळं आगामी काळात एलआयसी डिजिटल विमा क्षेत्रात वर्चस्व गाजवेल. MarTech प्लॅटफॉर्मद्वारे पॉलिसीधारक आणि एजंट यांच्याशी उत्तम संपर्क स्थापित केले जातील.
हे प्लॅटफॉर्म हायपर-पर्सनलाइज्ड आणि मल्टी-चॅनल मार्केटिंगची सुविधा प्रदान करतील. ज्यामुळं पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीबद्दल चांगली माहिती मिळेल. कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले की हे MarTech प्लॅटफॉर्म प्रोजेक्ट DIVE च्या पहिल्या टप्प्यांतर्गत लॉन्च केले गेले आहे. LIC नवीन डिजिटल क्षमता जोडत राहील, जेणेकरून ते जागतिक विमा क्षेत्रात आपले स्थान मजबूत करु शकेल.
हेही वाचा :
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट, रोहित आणि जडेजा घेणार निवृत्ती?
सुरेश धस, तुम्ही सुद्धा एकाच माळेतले मणी निघालात….!
लग्नासाठी नवरदेव सजला पण घोड्यावरच घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचा थरारक Video Viral