ठाण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे माणुसकीला काळिमा फासण्यात आला. एका नवीन लग्न झालेल्या महिलेवर तिच्या सासऱ्याने मित्रासोबत अत्याचार(tortured) केला आणि तिला १५ दिवस खोलीत डांबून ठेवले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती सासरच्यांपासून वेगळे राहत होते. ३० जानेवारीला सासऱ्याने(tortured) तिला आई-वडिलांकडे सोडण्याच्या बहाण्याने घरी नेले. मात्र, तिथे न नेता तिला स्वतःच्या घरी नेऊन एका खोलीत बंद केले. तिथे त्याने आपल्या मित्राला बोलावून घेतले आणि दोघांनी मिळून तिच्यावर १५ दिवस अत्याचार केला.
पीडितेने विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात आली. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरून पीडित महिला शांत राहिली.
एके दिवशी सासरा झोपलेला असताना पीडितेने संधी साधून घरातून पळ काढला. तिने थेट आई-वडिलांचे घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला आणि त्यांनी लगेच पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीनंतर नारपोली पोलिसांनी आरोपी सासऱ्यासह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६४, १२७(४), ३५१(३), ७४ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत कामथ यांनी सांगितले की, “आरोपींना लवकरच अटक करून कठोर कारवाई केली जाईल.”
हेही वाचा :
मोठी बातमी : शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Jio नं लाँच केला 195 रुपयांचा नवीन प्लॅन, JioHotstar चे सब्सक्रिप्शन मोफत
Airtel चा ‘हा’ प्लॅन खरेदी केलेल्या सर्व पोस्टपेड ग्राहकांना मिळणार ॲपल टीव्ही+ चा आनंद