राणीसारखं आयुष्य जगतेय प्रियांका चोप्रा; संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

बॉलिवूड ते हॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाने छाप सोडणारी ही (queen)अभिनेत्री आज एक जागतिक आयकॉन बनली आहे, जिचे जगभरात लाखो चाहते आहेत. ही अभिनेत्री अगदी राणीसारखे आयुष्य जगत आहे.आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे देसी गर्ल प्रियांका चोप्रा. प्रियांकाने मॉडेलिंगपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि मिस वर्ल्ड किताबही जिंकला. त्यानंतर तिने अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला. तिने बॉलिवूडमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.

‘ब्लफमास्टर’ २००५, ‘डॉन’ २००६, ‘फॅशन’ २००८, ‘कमिने’ २००९, ‘७ खून माफ’ २०११, ‘बर्फी’ २०१२ आणि ‘मेरी कोम’ २०१४ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. यासोबतच, प्रियांका चोप्रा अमाप संपत्तीची मालकीण आहे.

अमाप संपत्तीची मालकीण आहे प्रियंका चोप्रा-
प्रियांका चोप्राचे आयुष्य एखाद्या परीकथेसारखे आहे. (queen)ती कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि कपडे वापरते. तिचे काही पोशाख इतके महाग आहेत की, त्या किंमतीत एक घर खरेदी करता येऊ शकते. ‘लाइफस्टाइल एशिया’च्या एका अहवालानुसार, २०१६ च्या ऑस्करसोहळ्यात तिने २१.७५ कोटी रुपयांचे कानातले घातले होते. तिच्या पोशाखाला साजेशे ५० कॅरेटच्या हिऱ्याचे कानातले खूप आकर्षक दिसत होते.

प्रियांका तिच्या खास फॅशन सेन्ससाठी आणि महागड्या पोशाखांसाठी ओळखली जाते. तिने एका कार्यक्रमात ७२ कोटी रुपयांचा राल्फ अँड रुसो गाऊन परिधान केला होता. (queen)प्रियांकाने मेट गालामध्ये घातलेल्या पोशाखाची किंमत सुमारे ४५ लाख रुपये होती, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी २०१८ मध्ये लग्न केले. तिच्या एंगेजमेंट रिंगची किंमत २.१ कोटी रुपये आहे. या जोडप्याचे लॉस एंजेलिसमध्ये एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत अंदाजे १६० कोटी रुपये आहे. प्रियांकाचीएकूण संपत्ती ६५० कोटी रुपये आहे.

हेही वाचा :

घटस्फोटापूर्वी चहलला धनश्रीबद्दल कळले होते सत्य जगासमोर व्यक्त केले आपले दुःख

स्वयंपाक झाला की गॅसवर मीठ नक्की टाका अन्… महिलेनं सांगितले चमत्कारीक फायदे

रेझर वापरल्याने होतील त्वचेच्या समस्या, तुमच्या त्वचेसाठी काय आहे धोका?