प्रतिक्षा संपली! Samsung चे 3 दमदार स्मार्टफोन्स अखेर लाँच

लोकप्रिय स्मार्टफोन (smartphones)कंपन्यांपैकी एक असलेल्या Samsung ने आज 2 मार्च रोजी त्यांचे 3 नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Galaxy A सिरीज अंतर्गत हे स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने आज लाँच केलेल्या स्मार्टफोन्समध्ये Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26 यांचा समावेश आहे. कंपनीने आज या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स उघड केले आहेत. मात्र अद्याप स्मार्टफोन्सच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. कंपनी उद्या सोमवारी या तिन्ही स्मार्टफोन्सच्या किंमती जाहीर करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कंपनीने आज लाँच केलेल्या Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26 या स्मार्टफोन्समध्ये 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटससह डिस्प्ले आणि अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. कंपनी या स्मार्टफोन्सवर अँड्रॉइड OS चे 6 अपडेट्स आणि 6 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देईल. तुम्हाला हे स्मार्टफोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायासह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग आता या नवीन लेटेस्ट स्मार्टफोन्सच्या फीचर्सवर नजर टाकूया.

Galaxy A56 या फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले असेल. स्मार्टफोनची कमाल ब्राइटनेस पातळी 1900 निट्स पर्यंत आहे. 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायासह येतो. या स्मार्टफोनमध्ये(smartphones) तुम्हाला Exynos 1580 चिपसेट मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल मुख्य लेन्स, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे. 45 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

या स्मार्टफोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले उपलब्ध असेल. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये अड्रीनो 710 जीपीयूसह स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि फोटोग्राफीसाठी 5 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध असेल जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असेल. फोनमध्ये Exynos 1380 चिपसेट प्रोसेसर दिसेल. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य लेन्स, 8 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध असेल जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

हेही वाचा :

Jio चा ‘हा’ प्लॅन Airtel पेक्षा 50 रुपयांनी स्वस्त

शिवसेना शिंदे गट भाजपात विलीन करा; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

भयानक रस्ता अपघात; दोन बसच्या धडकेत 37 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी