Captain Rohit Sharma चा सिनेमा तुम्ही पाहिलात का ? क्रिकेटरने केलंय दिग्गज कलाकारांसोबत काम

क्रिकेट आणि बॉलीवूड यांचा संबंध फार जुना आणि घट्ट आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली तर मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान या दोन्ही जोडप्यांना चाहत्यांकडून भरभरुन प्रेम दिलं जातं. क्रिकेट(cricket) आणि बॉलीवूडच्या या केमिस्ट्रीला चाहते देखील भरभरुन प्रतिसाद देतात. मात्र क्रिकेट आणि बॉलीवूडची आणखी एक वेगळी बाजू देखील आहे.

टीम इंडियातील काही नावाजलेल्या खेळाडूंनी बॉलीवूडमध्ये आपलं नाव गाजवलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार(cricket) रोहीत शर्माने 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या एका बॉलीवूड सिनेमात दिग्गज कलाकारांबरोबर अभिनय साकारलाआहे. त्या सिनेमातचं नाव होतं व्हिक्टरी. या सिनेमातील एकव व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच गाजली आहे.

या व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, रोहित शर्मा नेटवर सराव करत असतो. फलंदाजी कराताना अचानक त्याच्या पायाला दुखापत होते. त्यामुळे रोहितला माघार घ्यावी लागते आणि त्याच्या जागी फलंदाजीकरीता सिनेमाचा मुख्य नायक येतो. या सिनेमात हरमन बावेजा, अमृता राव आणि अनुपम खेर या सिनेमात मुख्य कलाकर होते.

व्हिक्टरी हा 2009 चा भारतीय क्रिकेट विश्वासावर आधारित सिनेमाआहे. य़ा सिनेमाचं दिग्दर्शन अजित मंगत यांनी केलं होतं. त्यावेळी रोहित शर्माने या सिनेमात कॅमिओ केला होता. क्रिकेट व्यतिरिक्त देखील रोहितने अभिनय क्षेत्रातही कामं केलं आहे हा त्याच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का देखील ठरला आहे. असाच आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला ज्याचं नाव होतं डबल एक्सएल. या सिनेमा 2022मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांच्या बरोबर क्रिकेटर कपिल देव आणि शिखर धवन हे देखील सिनेमात झळकले आहेत.

सध्या चॅम्पिअन शिप2025 चे वारे वाहत आहेत. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार असून सामन्याचे नाणेफेक झाले आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याची दोन्ही संघाची प्लेइंग 11 समोर आली आहे. यामध्ये हर्षित राणाला बाहेर बसवले आहे आणि वरुण चक्रवर्तीला संघामध्ये स्थान मिळाले आहे.

शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा हे खेळाडू आता सज्ज झाले आहेत तर रोहित शर्मा हा कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळत आहे. आजच्या या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं आता औस्त्युक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा :

भयानक रस्ता अपघात; दोन बसच्या धडकेत 37 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

प्रतिक्षा संपली! Samsung चे 3 दमदार स्मार्टफोन्स अखेर लाँच

शिवसेना शिंदे गट भाजपात विलीन करा; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना सल्ला